पंढरपूर प्रतिनिधी --
सुवर्णपंढरी पांचाळ सुवर्णकार समाज संघटना पंढरपूर च्या वतीने पंढरपूर संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज समाधी मंदिरात श्री विश्वकर्मा जयंती धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.
पंढरपूर येथील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर महाव्दार येथे आज श्री विश्वकर्मा जयंती वेदमूर्ती चि.आशुतोष अनिल महामुनी भटजी यांच्या सुश्राव्य वैदीक मंत्र उच्चाराने श्री विश्वकर्मा यांच्या मुर्तीस जलाभिषेक,दुग्ध अभिषेक सह महापुजा करण्यात आली. आज सकाळी ०६:०० ते ०८:०० यावेळी यजमान मुकेश अरूणराव पंडित व सुप्रिया मुकेश पंडित पंढरपूर , शशिकांत ज्ञानेश्वर पोतदार व राजश्री शशिकांत पोतदार पंढरपूर , विनायक रामभाऊ महामुनी व सुलभा विनायक महामुनी पंढरपूर, बसवराज कृष्णाथराव पोतदार व ज्योती बसवराज पोतदार पंढरपूर या जोडीच्या हस्ते पुजन व अभिषेक करण्यात आले.
यावेळी पंढरपूर येथील वेदमूर्ती ह.भ.प. प्रशांत किरण महामुनी भटजी, सतीश दत्तात्रय पारखे, प्रविण कालिदास महामुनी, रमेश सुरेश महामुनी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच सुवर्णपंढरी पांचाळ सुवर्णकार समाज संघटना पंढरपूर चे अध्यक्ष मुकुंद बापूसाहेब वेदपाठक यांच्या तर्फे गोड शिरा वाटप करण्यात आले यावेळी केशव चंद्रकांत महामुनी भटजी यांनी महाप्रसादाचे वाटपाचे कार्य केले.
पंढरपूर येथील सर्व समाज बांधव व भाविक भक्त यांनी सकाळी सकाळी लवकर येऊन श्री विश्वकर्मा जयंती निमित्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी आनंद रोपळकर,आनंद कासेगांवकर, राजेंद्र कासेगांवकर,मनोज कासेगांवकर, महेश धर्माधिकारी, नंदकुमार बिपेटकर, हरिभाऊ भुमकर, पत्रकार विनोद पोतदार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
धार्मिक वार्ता