शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेतकरी मेळावा, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची शेतकऱ्यांना मिळणार मेजवानी...
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथे दिनांक २३,२४,२५,२६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान येथील रेल्वे मैदान येथे करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन
या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा, सहप्रयोजक साईश्री ऍग्रो कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून यादिवशी खिलार गाई प्रदर्शन, शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी भव्य शेतकरी मेळावा व चर्चासत्र, रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत डॉग शो, कॅट शोचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ नंतर महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम, सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात चर्चासत्र व सायंकाळी ६ वाजता 'मराठी पाऊल पडते पुढे' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन....
शेतीबाबत शेतकरी आज हवालदिल असून शासकीय स्तरावर देखील आपल्या तालुक्याला दुष्काळी यादीतून असेल किंवा पिक विमा मदती मधून वारंवार वगळण्यात आले आहे, त्यामुळे शेती कशी करावी याबाबत तरुण शेतकरी चिंतेत आहे, त्याला आता आधुनिक शेतीची जोड दिल्याशिवाय आणि शेतीपूरक व्यवसाय व पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय ची जोड देण्याशिवाय पर्याय नाही आणि हे स्वीकारले तरच आपण आपली प्रगती करून या स्पर्धेच्या युगात सन्मानाने टिकून राहू.
शासकीय स्तरावर याबाबत खूप योजना असूनही जन जागृती नसल्याने आणि माहिती नसल्याने आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही, शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन न मिळाल्याने शेतीचे गणित बिघडत आहे, गट शेती असेल, महिला बचत गट असतील, लघु उद्योग असतील यामधे जास्त काम करून आपण या भागाचे अर्थकारण नीट करू शकतो, पण त्यासाठी या योजना आणि माहिती आणि त्याचा लाभ कसा घ्यावा बँका, पतसंस्था कोणत्या निकषावर अर्थ सहाय्य करतात हे नीट समजावून सांगणे शेतीतील नवीन पीक प्रयोग लोकांना सांगून त्यांना प्रेरणा देणे, वेगवेगळी शेतीचे अवजारे यंत्रे शासकीय स्तरावर कशा प्रकारे मिळवता येतात याबाबत योग्य मार्गदर्शन करणे आज गरजेचे आहे असे मला वाटते म्हणून "भारत कृषी महोत्सव" चे आयोजन करून ते शिवधनुष्य उचलण्याचा पण आपण केला असून त्यासाठी राबणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या हाताला यश येण्यासाठी आणि तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चैतन्य येण्यासाठी या महोत्सवात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी आपणाला विनंती करत आहे.
आपला सेवक --
भगिरथ भालके
Tags
सामाजिक वार्ता