मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीने करण्यात आली नियुक्ती
पंढरपूर प्रतिनीधी---
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा
नुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी १९डिसेंबर रोजी पालकमंत्री यांना पूर्वी पाठविलेल्या पत्राचे स्मरण पत्र दिले होते. यानुसार पालकमंत्री यांनी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून महेश साठे, जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, मनीष काळजे, महेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महेशनाना यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी निवड झाली होती. पालकमंत्र्याच्या यादीत देखील त्यांचे नाव होते. नियोजन विभागाच्या यादीत देखील नाव होते.पोलीस वेरिफिकेशन देखील झाली होते. उपमुख्यमंत्री महोदयाची देखील त्या ठिकाणी सही झाली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयातून शासन निर्णयामध्ये ऐन वेळेस त्यांचे नाव कट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अपमानित करण्यात आले होते. महेशनाना साठे हे फक्त एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्यामुळे त्यावेळेस या गोष्टी झाल्या होत्या. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महेशनाना साठे यांच्या वरती झालेल्या अन्यायाला न्याय दिला . यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो हे सिद्ध झाले आहे.
चौकट
जिल्हाधिकारी यांचेकडून बैठकीचे निमंत्रणही
सोलापूर जिल्ह्यातील नियोजन समितीची बैठक गुरुवार दिनांक २८डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महेशनांना साठे यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून उपस्थित राहण्याचे लेखी पत्र मिळाले आहे. या बैठकीस दुपारी एक वाजता सोलापूर येथील सात रस्ता येथे नियोजन भवन मध्ये साठे उपस्थित राहून विकास कामाबाबत सूचना करणार आहेत.
Tags
राजकीय वार्ता