पंढरपूर प्रतिनिधी---
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर जिल्हा दौरावर आले असता पंढरपूर येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या ४० वर्षीत जेवढी विकासाची कामे झाली नाहीत तेवढी विकास कामे गेल्या ५ वर्षात झाली आहेत याबाबत मतदारातून समाधान व्यक्त होत आहे.
प्रदेशाध्यक्ष यांच्या दौरामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असून ग्रामीण व शरीरातील कार्यकर्ते सोबत ते बैठक घेत आहे पुढे बोलताना ते म्हणाले की ५ जानेवारी पर्यंत ४८ लोकसभा मतदारसंघाचा दौरा पूर्ण करणार तसेच मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपाचे ताकद वाढवून जनतेसाठी केलेल्या कामाची माहिती घरोघरी पोचवण्याची सुचना करण्यास सांगितले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून सखोल माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर आज पंढरपूर येथे सुपर वॉरियर बैठक घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन तसेच सूचना केल्या. या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे उतस्थित होते.
पंढरपूर येथे अवैध धंदे बंद पाडणार--
पंढरपूर हे महत्त्वाचे तिर्थक्षेत्र असुन याठिकाणी जर भाविकांना त्रास सहन करावा लागत असेल तर खूपवुन घेतले जाणार नाही.शासनाकडून लाखो रुपयांचा निधी येतो तर भाविक व भक्तांना सेवा,सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.याबाबत आपण विशेष लक्ष देवून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देऊन पंढरपूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
Tags
राजकीय वार्ता