वाखरीत आजपासून यल्लमा देवीची शतकमहोत्सवी यात्रा

पंढरपूर प्रतिनिधी ---
वाखरी येथील ग्रामदैवत यल्लमा देवीची दोन दिवसीय यात्रा सुरु होत आहे. यंदा यात्रेचे शतक महोत्सवी वर्ष असल्याची माहिती पुजारी नारायण पोरे यांनी दिली.
पोरे म्हणाले, वाखरी येथील यल्लमा देवस्थान  पंढरपूर तालुक्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्गशीर्ष द्वादशी आणि त्रयोदशी या दोन दिवसात देवीची यात्रा परंपरेनुसार साजरी करण्यात येते. पहिल्या दिवशी देवीला नैवेद्य, भाविकांकडून नवसपूर्ती केली जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माहेर, दुपारी कुंड आणि सायंकाळी कीच (होम प्रवेश) कर्यक्रम साजरा केला जातो. दोनही पारंपरिक कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध भागातून हजारो भक्त येत असतात. यंदाचे यात्रेचे १०० वे वर्ष असून गावातील स्वच्छता, पाणी पुरवठा अशी सोय ग्रामपंचायतीने केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form