कोळेकर महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती
नाझरे प्रतिनिधी----
कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे व भगवंताचे स्मरण भगवंतांच्या प्राप्तीसाठीच करायचे असते, त्यांच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो व हाच उद्देश ठेवून श्री दत्त देवस्थान मोराळे पेड तालुका तासगाव येथे श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे व यावेळी श्री श्री श्री 108 गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी ची विशेष उपस्थिती राहणार आहे असे गुरु नृसिंह सरस्वती भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले.
श्री गुरुदेव दत्त देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती गुरु नृसिंह सरस्वतीच्या अवतारामुळे व त्यांच्या अवतारा नंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदुंबरवाडी, गाणगापूर व आता मोराळे पेड ही तीर्थक्षेत्र बनली.
मोराळे पेड येथे दत्त जयंती निमित्त मंगळवार दिनांक 26/12 रोजी सकाळी पहाटे पाच ते आठ श्रीस अभिषेक, सकाळी आठ ते बारा भजन व नामस्मरण, दुपारी बारा वाजता श्री गुरुदेव दत्त प्रभूंचे आगमन, दुपारी 12 ते 12 वाजून 35 मिनिटांनी आरती व ग्रंथ वाचन पाळणा, दुपारी 12/35 ते 12.50मान्यवरांचे स्वागत यामध्ये डॉक्टर परम शेट्टी व डॉक्टर भावे तसेच इतर मान्यवर यांचे स्वागत होईल. दुपारी 12.50ते 1.20भक्ताचे मनोगत, दुपारी 1.20ते 2 शिवदत्त महाराजांच्या आरतीचा महिमा व शारीरिक व्याधीवरील कार्य व गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन व महाप्रसाद वाटप होईल तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन रवींद्र स्वामी आबा यांनी केले आहे.
Tags
अध्यात्मिक वार्ता