नरखेडच्या सच्चा शिवसैनिकास उद्योजक राजू खरे यांची मोलाची मदत..
पंढरपूर प्रतिनिधी --
मोहोळ येथिल नरखेडचे शिवसैनिक हरिभाऊ खंदारे यांचा अपघात झाला याची वार्ता कळली आणि तातडीने मोहोळ तालुक्यातील सच्चा शिवसैनिकास उद्योजक राजू खरे यांनी केली मोलाची मदत आणि त्यांच्या परिवारस दिला आर्थिक आधार.
बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आजवर शिवसेनेचे सच्चा कार्यकर्ता म्हणून मोहळ तालुक्यात सुपरिचित असलेले आणि
मोहोळ तालुक्यातील नरखेड गटाची बाजू लढवणारा शिलेदार म्हणून त्यांची सामाजिक व राजकीय ओळख आताना अचानक त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली.त्यात ते जबर जखमी झाले, त्यांना सोलापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील या शिवसैनिकची परिस्थितीची बेताची आहे. उपचाराचा खर्च पेलताना कुटुंबातील सदस्यांची दमछाक होत आहे.
यावेळी उद्योजक राजू खरे यांना सदर वार्ता कळली आणि ते स्वतः त्यांना लागणारी सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांना तातडीची आर्थिक मदत दिली.राजकीय हेवेदावे बाजूला सारून माणुसकी जपत राजू खरे यांनी त्यांच्या परिवारास पन्नास हजार रुपये दिले आणि यापुढेही हरिभाऊ खंदारे यांच्या परिवारातील सदस्यांना जमेतशी मदत करणार असे राजू खरे म्हणाले आपलं उभ आयुष्य शिवसेनेच्या पक्षासाठी झिजवलं पण त्याच शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांनी मात्र खंदारे यांच्या पाठीशी उभे राहण्याची खरी गरज होती पण ते कुठे ते दिसून आले नाही मात्र राजू खरे यांनी केलेल्या या कार्याची संबंध तालुक्यात व जिल्ह्यात चर्चा होताना दिसून येत आहे
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे, तालुका संघटक समाधान खंदारे मोहोळ, विधानसभा अध्यक्ष दादा पारवे व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता