वैध पुराव्याच्या आधारे कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी प्रशासन सज्ज---प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर प्रतिनिधी ---
भोसे ता.पंढरपूर येथे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करताना प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले , गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सपोनि सागर कुंजीर, सपोनि निलेश तारू, महादेव तळेकर, अजय जाधव, शरद मलपे, बाळासाहेब जमदाडे आदींसह  लाभार्थी. (छायाचित्र : सुनील कोरके, भोसे).

भोसे (क), ता. १२ :  आतापर्यंत तहसील कार्यालय , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदी ठिकाणी कुणबी जातीची नोंद असणारे जे पुरावे सापडले आहेत त्या पुराव्यापर्यंत पोचणारे इतर कागदोपत्री पुरावे कि ज्या पुराव्यामुळे वंशावळ पूर्ण होईल असे पुरावे अधिकृत महा ई सेवा केंद्रात दाखल करा त्या पुराव्यांची पडताळणी करून तात्काळ कुणबी जातीचे दाखले देण्यात येतील यासाठी महसूल प्रशासन सज्ज असल्याचे  प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. 
ते भोसे (ता.पंढरपूर) येथे राजर्षी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कुणबी मराठा दाखले कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिराच्या वेळी बोलत होते.
 यावेळी  तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले , गट विकास अधिकारी प्रशांत काळे, सहायक पोलिस निरीक्षक  सागर कुंजीर, सहायक पोलिस निरीक्षक निलेश तारू, अजय जाधव, महादेव तळेकर, अॅड. नितीन खटके उपस्थित होते. यावेळी प्राथमिक स्वरुपात सहा लाभार्थ्यांना कुणबी-मराठा जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी एक्केचाळीस प्रकारच्या कागद
पत्रामधून कुणबी नोंदीची पाहणी करता येईल असे सांगितले.  तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी एकट्या भोसे गावात दोनशे पन्नास नोंदी सापडल्या आहेत, प्रत्येक नोंदिपाठीमागे दहा दाखले जरी निघाले तरी साधारण दोन ते अडीच हजार दाखले मिळतील असे सांगितले. तसेच ज्या नोंदी तहसील कार्यालयात सापडल्या आहेत त्या नोंदी तात्काळ प्रमाणित करून दिल्या जातील जेणेकरून तो पुरवा अधिकृत म्हणून ग्राह्य धरला जाईल असे सांगितले. 

यावेळी मंडळ अधिकारी गणेश साठे, मंडळ अधिकारी रीगन चव्हाण, तलाठी प्रमोद खंडागळे, मोहन तळेकर, मारुती कोरके, संजय तळेकर, भगवान अडगळे , भारत कोरके, औदुंबर मलपे, बाळासाहेब जमदाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महादेव तळेकर यांनी मानले.

या कागदपत्रामधून शोधा कुणबी जातीच्या नोंदी : 
खासरा पत्रक, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, पाहणी पत्रक, नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक,  क पत्रक, नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक,  कुळ नोंदवही, सातबारा उतारा,  जन्म व मृत्यू रजिस्टर, गाव नमुना नंबर १४,  कोतवाल बुक नक्कल, निर्गम उतारा, शाळा सोडल्याच्या दाखल्यात जर कुणबी उल्लेख असेल, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही , आस्थापना अभिलेख , गाववारी, गोपनीय रजिस्टर सी एक व सी दोन , क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे , एफ आय आर रजिस्टर, खरेदीखत नोंदणी रजिस्टर , डे बुक , करारखत, साठेखत , इसार पावती, भाडे चिट्ठी , ठोक पत्रक , बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्यूपत्रक, इच्छा पत्रक, तडजोड पत्रक, पक्का बुक , शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला  प्रति बुक, रिविजन प्रति बुक, क्लास्टर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक.
सुनिल कोरके, भोसे . ९४२१२६९०९०.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form