आज पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू

कार्तिक वारी निमित्त दररोज नित्यपुजा...
* पहाटे ४.०० ते ५.०० नित्योपचार
सकाळी १०.४५ ते ११.०० महानैवेद्य 
*  रात्री ८.३० ते ९.००  गंधाक्षता
पंढरपूर प्रतिनिधी --
कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) गुरूवार, दि. २३ नोव्हेंबर,२०२३ रोजी साजरी होत आहे. दरवर्षी यात्रेला विठ्ठल भक्त, भाविकांची, वारकरी मंडळी यांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते तसेच दररोजच्या नित्य उपचार काळावधी वगळता सर्वांना पददर्शक घेतला येईल असे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच आज गुरुवार दि. १६ नोव्हेबंर २०२३ रोजी श्रीं चा पलंग परंपरेनुसार काढण्यात
आला असून श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार बंद होवून खालील राजोपचार प्रक्षाळपुजे
पर्यंत म्हणजे दि.०१ डिसेंबर २०२३ रोजी पासून सुरू होतील याची सर्व भाविक
भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.दि. १६ नोव्हंबर २०२३ ते ०१डिंसेबर २०२३ या कालावधीत खालील नित्योपचारा च्या वेळा वगळता २२.१५तास पदस्पर्श दर्शन व २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे.
यावेळी मंदिर समितीचे  सह अध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर, मा सदस्य
श्रीमती शकुंतला नडगिरे,ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर महाराज), व सल्लागार समितीचे सदस्य अनिल अत्रे तसेच कार्यकारी अधिकारी  राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form