कृषीभुषन डॉ.तानाजीराव चोरगे यांचा चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते सन्मान

भाळवणी प्रतिनिधी --
 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि चंद्रभागानगर- भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर या कारखान्याचे वतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन कृषीभुषन डॉ. तानाजीराव चोरगे यांना इंटेलिक्चुअल पिपल्स फाऊंडेशन, दिल्ली या संस्थेकडून देश पातळीवरील बेस्ट चेअरमन परफॉरमन्स अवार्ड २०२२ मिळालेबदद्दल तसेच वैकुठभाई मेहता उकृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून रत्नागिरी जि. मध्य. बँकेस पुरस्कार मिळालेबददल चेअमरन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी त्यांचे सहकारी दत्ता पाटील संस्थापक आय. टी. आय कॉलेज रत्नागिरी यांचा सत्कार कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर तसेच  दत्तात्रय दुरगुळे अध्यक्ष पोलिस कर्मचारी पतसंस्था रत्नागिरी यांचा सत्कार संचालक मोहन नागटिळक यांनी केला.

पंढरपूर तालुक्यातील मौजे उपरी येथील कन्या कु. प्राजक्ता सुनिल कोळी यांनी महाराष्ट लोकसेवा आयोग मार्फत परिक्षेत यश संपादन करुन मंत्रालयात लिपिक सहाय्यक पदी तसेच संदिप शंकर कोळी रा. उपरी यांची म्हाडा मुंबई येथेअसि.ओ.एस.ओ पदी निवड व श्री. कुमार भोसले यांची आर. पी आय पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबददल त्यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व डॉ. तानाजीराव चोरगे यांचे शुभहस्ते करण्यात आला.

कारखान्याचे नूतन चेअरमनपदी  कल्याणराव काळे व व्हा. चेअरमनपदी  भारत कोळेकर यांची निवड झाल्याबददल रत्नागिरी सह. बँकेच्या वतीने डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सत्कार केला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन यांनी आपल्या मनोगतात कारखाना अडचणीत असताना बँकेने आमचे कारखान्यास सहकार्य केले त्यांनी वेळोवेळी कारखान्याची प्रगतीची चौकशी करुन कारखान्यास अडचणीतून मार्ग काढणेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले त्याबददल मी कारखान्याचे संचालक व सभासदांचे वतीने आभार मानतो व असेच सहकार्य आमचे कारखान्यावर असावेत ही आशा व्यक्त करतो.

डॉ.तानाजीराव चोरगे साहेब यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री गोरख जाधव, दिनकर कदम, योगेश ताड,युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, सुनिल सराटे- पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुरेशबापू देठे, इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री झुंजार आसबे यांनी मानले..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form