हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे के.जी.एन. ग्रुप यांच्या वतीने अन्नदान


पंढरपूर प्रतिनिधी --
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे केजीएन ग्रुप यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. संपूर्ण जगाला मानवता एकता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अनुयायी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली मानवतेची शिकवण आणि त्यांनी केलेले संस्कार कायम राखत केजीएन ग्रुपच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील वयोवृद्ध माता-भगिनींना अन्नदान करून हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अन्नदान हे श्रेष्ठदान समजले जाते आणि अन्नदान केल्याने सर्वात मोठे पुण्य लाभते अशी प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केली. पंढरपूर येथील कालिकादेवी चौक येथील केजीएन ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक इस्माईल बोहरी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे भास्कर दादा कसगावडे, नगरसेवक  डी राज सर्वगोड, गणेश माने, जुलूस कमिटीचे अध्यक्ष  गौसभाई धारूरकर, माजी शिक्षण सभापती, बशीर शेख, अश्फाक तांबोळी (सर) , समाजसेवक  मुझमिल कमलीवाले,  इस्माईल नाडीवाले शहानवाज मुलानी, सईद सय्यद, जुबेर तांबोळी, ॲड. बिलाल कडगे,  शफिक मुलानी, असलम तांबोळी, हुशेन तांबोळी, शकील मुल्ला, आसिफ आतार, वसीम तांबोळी, मोईन तांबोळी, जितू भांडेकर, अजीज तांबोळी, गौस तांबोळी, स्वप्निल सर्वगोड, सद्दाम तांबोळी, सद्दाम मुजावर, अनीस मुजावर, इर्शाद तांबोळी, मन्नू तांबोळी, रियाज तांबोळी, यांच्यासह , के जी एन ग्रुपचे सर्व सदस्य, आयबी ग्रुपचे सर्व सदस्य ,ओन्ली के जी एन ग्रुपचे सर्व सदस्य ,एम बॉईज ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form