पंढरपूर प्रतिनिधी--
दि.पंढरपूर अर्बनको.ऑपरेटिव्ह बँकेच्या टाकळी शाखेचा पाचवा वर्धापनदिन युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी चेअरमन सतिश मुळे बोलताना म्हणाले की,पंढरपूर अर्बन बँकेही पंढरपूर शहर व तालुक्यातील अर्थवाहीण असणारी अग्रगण्य संस्था असून समाजातील विविध घटकांना पथ पुरवढा करणारी ग्राहक विश्वास पात्र संस्था असून अर्बन बँकेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करीत बैंक प्रगतीपथावर आहे.सर्व सामान्य नागरिक, व्यवसायिक, सभासद यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत बैंकेच्या विविध कर्ज पुरवठा योजनांची माहिती घेऊन ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
पंढरपूर अर्बन बँक टाकळी रोड शाखा या बँकेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेमध्ये बँकेचे मार्गदर्शक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस व पांडुरंगाच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण करून सत्यनारायण महापूजा करण्यात व ग्राहक मेळावा ही आयोजित करण्यात आला होता
याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी संचालक रजनीश कवठेकर,हरीश ताठे, मनोज सुरवसे, शेटे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच संजय साठे, शिवसेना एकनाथ शिंदे गट जिल्हाप्रमुख महेश साठे, ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवण, माजी सरपंच अनिल सोनवणे, माजी सदस्य औदुंबर पोतदार, आबा पवार रामदास ढोणे तसेच हुसेन तांबोळी मिलिंद देवल आदी मान्यवर मंडळी, सभासद, हितचिंतक, बैंकेचे ग्राहक उपस्थित होते
Tags
सहकार वार्ता