मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरूअसतानाचउपोषण स्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली तद्नंतर पंढरपूर येथे गणेश जाधव या युवकाने पंढरपुर येथील तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरू केले याबद्दलची माहिती तसेच चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षणासाठी आपल्या हक्काची लढाई लढणाऱ्या आंदोलनकर्त्या युवकाला भेट घेण्यासाठी आ.समाधान आवताडे प्रशासन अधिकारी यांच्यासह उपोषण स्थळी भेट दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा समाज बांधव गणेश जाधव यांच्या उपोषणास पाठिंबा दिला तसेच पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे असे ते म्हणाले,यावेळी आ.समाधान दादा आवताडे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत उपोषण स्थळी भेट देऊन मराठाआरक्षणाची मागणी शासन दरबारी पोहोचवून यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले ,तहसीलदार सुशील बेल्हेकर , पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील,अरुण फुगे तसेच इतर मान्यवर मंडळी,पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील गणेश जाधव हा तरुण सकल मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दि. ८ ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसला आहे.
Tags
सामाजिक वार्ता