राज्य सरकारने मराठा समाजाला ओ.बी.सी. मधून ५० टक्के आरक्षण दिले पाहिजे
पंढरपूर प्रतिनिधी ---
राज्य सरकारने मराठा समाजाला ओ.बी.सी. मधून५०टक्के आरक्षण दिले पाहिजे,नाहीतर आमचे जावळे पाटीलांचे छावे सरकारला सळो की पळो करुन सोडतील असा इशारा पंढरपूर येथे मराठवाडा येथून आलेल्या आंदोलकांनी दिला.
पंढरपूर येथे वनवासी पोशाख घालून सोमवार दि ११ रोजी नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात आले. हे सरकार कुणबी आणि मराठा समाज यांच्यात दरी निर्माण करीत आहे. श्री विठ्ठलाने या सरकारला सद्बुद्धी देवो, असे साकडे घातले असल्याचे सांगितले.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज , गोळीबार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यात यावे. सरकार समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहे.पण त्याचे हे कारनामे यशस्वी होऊ देणार नाही. सर्व अठरा पगड जातींच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाचा वनवास मिटला पाहिजे. अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मराठा वनवास यात्रेचे आयोजक सुनील भाऊ नागणे, प्रतापसिंह कांचन पाटील,संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर , सागर कदम,सुमित शिंदे,औदुंबर खलाटे , शिवाजी जाधव,प्रशांत कांचन,चंद्रकांत नागणे,रविंद्र शिंदे,शिवशंकर शिंदे , संदिपान नागणे,विशाल सावंत,गणेश नागणे , गणेश घाडगे,अण्णासाहेब नलावडे ,आदिनाथ खलाटे , शिवराज शिरशीकर , लक्ष्मण शिरसाट , यासह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. नामदेव पायरी परिसर विविध घोषणांनी दुमदुमून गेला होता.
Tags
सामाजिक वार्ता