पंढरपूर रोटरी क्लबने सर्वोत्तम कामगिरी केली म्हणून ७ विविध पुरस्कार देऊन केले सन्मानित

पंढरपूर रोटरी क्लबच्या इतिहास ऐतिहासिक सामाजिक कामगिरी
पंढरपूर: प्रतिनिधी
रोटरी क्लब चा वार्षिक पुरस्कार  वितरण सोहळा रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी औरंगाबाद येथील गुरु लान्स मध्ये डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये पंढरपूर रोटरी क्लब ने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल  विविध ७ पुरस्कार देऊन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ ला गौरविण्यात आले आहे.
    औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहणे म्हणून डाॅ. गिरीश जाखोटिया, डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रुकमेशजी जाखोटिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
     सामाजिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब पंढरपूर ला २०२२-३३ या वर्षी बेस्ट क्लब पुरस्कार, बेस्ट प्रेसिडेंट पुरस्कार, बेस्ट रायला पुरस्कार, बेस्ट मेम्बरशिप डेव्हलपमेंट पुरस्कार, बेस्ट एफर्टस फॉर डिस्ट्रिक्ट कॉन्फरेन्स पुरस्कार, बेस्ट पार्टीसिपेशन इन न्यू जनरेशन ऍक्टिव्हिटी पुरस्कार आणि बेस्ट टेकनोसवि क्लब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
    यावेळी मनोगत व्यक्त करताना रो. रुकमेशजी जाखोटिया म्हणाले, रोटरी क्लब पंढरपूर च्या ८५ वर्षे इतिहासाला साजेशी अशी हि सर्वोत्तम कामगिरी असुन यापुढे पंढरपूर रोटरी क्लब च्या सर्व सदस्यांनी अशीच सामाजिक कामगिरी करतील हि अपेक्षा या व्यक्त केली.
   या कार्यक्रमास माजी प्रांतपाल हरीश मोटवानी, माजी प्रांतपाल इस्माईल शेख, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख व रो सुधीर लातुरे (प्रांतपाल २५-२६) या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न झाला.दरम्यान अनेक मान्यवरांनी पंढरपूर रोटरी क्लबने केलेल्या ऐतिहासिक सामाजिक कार्य कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  या कार्यक्रमास रो. कैलाश करांडे, रो. सचिन भिंगे सह रोटरी क्लब पंढरपूरचे रो. जयंत हरिदास, रो. किशोर निकट, रो. सोमेश गानमोटे, रो. आनंद गोसावी, रो. भारत ढोबळते, रो. मयूर परिचारक उपस्थितीत होते. या कार्यक्रमात विशेष रो. डॉ. कैलाश करांडे व रो. सचिन भिंगे यांनी केलेल्या कामाचे सर्व थरातून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form