समाजसेवक मुजम्मील कमलीवाले ठरले जॉईन फॉर पीस शांतता पुरस्काराचे मानकरी

उद्या सोलापूर येथे होणार पुरस्कार प्रदान
सोलापूर प्रतिनिधी ---
जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर, समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर समाजातील विषमता नष्ट करून शांतता व सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होवून शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे, याचाच एक स्कूल, भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजीक

ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करण्याच्या व्यक्तींना मागील चार वर्षापासून जेपी शांतता पुरस्कार २०२३ ने सन्मानीत करण्यात येत आहे.

या वर्षी पुरस्काराचे मानकरी म्हणून प्रा. डॉ. डॉ. श्रीकांत येळेगावकर (सामाजिक कार्यकर्ते व नि. प्राध्यापक राज्यशास्त्र), प्रमोद दादा गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते), मुजम्मील कमलीवाले (पंढरपूर- समाजसेवक), फादर जेसॉन अँन्थोनी ( सामाजिक कार्यकर्ते- प्राचार्य, सेंट थॉमस सोलापूर) निवड झालेली आहे. निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमास शहारातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी संध्या. ६.३० वा. अचिव्हर्स मल्टीपर्पज हॉल नं.१ ग्रामीण पोलिस मुख्यालय समोर, नागरिक व निमंत्रित्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार यांची आहे. अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे. या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form