माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी अहवाल काळात निधन झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून सूरवात करण्यात आली.2022- 2023 या अहवाल वाचन संस्थेचे सचिव व्यवस्थापक रघुनाथ नरळे यांनी अहवाल वाचन केले.यावेळी 2021 22 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले .त्याचप्रमाणे चालू वर्षी 2022-23 या आर्थिक अहवाल काळात संस्थेची एकूण वार्षिक उलाढाल दोन कोटी चौदा लाख बारा हजार रुपये एवढी होऊन अहवाल काळात कर्जवाटप 19 लाख 87 हजार वसुलीचे प्रमाण 40% पेक्षा जास्त 31. 3 .2023 अखेर नफा 61 हजार 570 एकूण संक्षेप ठेवी 75 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सहकारी कोर्टात दावे दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख यांनी सभासदांनी संस्थेची संक्षेप ठेव वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व गरजूंनी छोट्या-मोठ्या उद्योगासाठी कर्जाचा लाभ घ्यावा तसेच यापतसंस्थेमार्फत सोनेतारण कर्ज ,संक्षेप ठेवीवर तातडीने कर्ज देण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे.
यावेळी पतसंस्थेचे संचालक अरिफखान पठाण यांनी पतसंस्थेकडे ठेवी शिल्लक असून लोकांची कर्ज मागणी कमी आहे तसेच कर्ज पुरवठ्याची मर्यादा सभासदाच्या मागणीनुसार पाच लाखापर्यंत करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी दामोदर लोखंडे,नामदेव देशमुख ,संग्राम पाटील यांनी पतसंस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त केले .
तसेच यावेळी पतसंस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्ष उपाध्यक्ष ची बिनविरोध निवड झाल्याने अध्यक्ष रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख तसेच संजय रोकडे यांचा संस्थेचे सभासद जहांगीर शेख यांनी विशेष सत्कार केला.संस्थेचे संचालक प्रा. तुकाराम पडळकर यांनी आभार व्यक्त केले.यावेळी अध्यक्ष नानासाहेब देशमुख, संचालक आरिफखान पठाण ,तुकाराम पडळकर, संजय रोकडे, प्रभाकर वाघमारे ,नामदेव देशमुख ,जगन्नाथ करडे, विशाल पिसे,विठ्ठल भिसनज दामोदर लोखंडे, संग्राम पाटील ,गोविंद भैस, दत्तात्रय भैस ,अतुल नष्टे, कल्याण जावळे,लक्ष्मण काळे, जिजाबा वाघमारे ,जहांगीर शेख, संतोष बगाडे ,महादेव वाघमारे,महादेव तावरे ,विजय माळी व बहूसंख्य सभासद उपस्थित होते . शाखा व्यवस्थापक रघुनाथ नरळे कर्मचारी विठ्ठल जाधव गणेश ढेकळे अशोक राजमाने यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
Tags
सहकार वार्ता