समाज जागृतीमध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा---- महेश साठे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम हे पत्रकारा बरोबरच समाज हिताचे
पंढरपूर प्रतिनिधी ---
 सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये समाज हिताचे कार्य करणे महत्वाचे असून जागृत व सक्षम समाज घडविण्यासाठी पत्रकारांचे काम सर्वोत्तम आहे. माध्यमांच्या माध्यमातून मांडल्या जाणार्या विविध क्षेत्रातील भुमिकांमुळे सामान्य समाजाला न्यायीक अधार मिळत आहे. त्यामुळे सध्या समाज जागृतीमध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन शिवसेना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा पंढरपूर शहर व तालुक्याच्यावतीने संघाच्या सदस्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळे प्रसंगी महेश साठे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमाहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे हे होते.    
     तर यावेळी व्यासपीठावर संघाचे 
पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, शहराध्यक्ष नागेश अदापुरे, राजकुमार घाडगे, राधेश बादले पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघातील सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

पुढे बोलताना महेश साठे यांनी सांगितले कि, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम हे पत्रकारा बरोबरच समाज हिताचे आहेत. तर पत्रकार संघाकडून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये पार पाडण्यात येत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या वाईट घटनांची मांडणी पत्रकारांनी लावून धरल्यास चांगल्या समाज निर्मितीसाठी त्याचा चांगलाच फायदा होईल. असेही ते यावेळी म्हणाले यावेळी राजेंद्र कोरके पाटील , अविनाश गरगडे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांना मार्गदर्शन केले.

या कार्यकमासाठी संघाचे  सचिन कुलकर्णी, विनोद पोतदार, दादा कदम, कुमार कोरे,संजय यादव, राजकुमार घाडगे, रवींद्र कोळी, अश्पाक तांबोळी, नेताजी वाघमारे, मारुती वाघमोडे,अजित देशपांडे,रामदास नागटिळक,रोहन नरसाळे, संतोष मोरे,संजय ननवरे, धनाजी राक्षे  आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form