आंबे येथे अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

पंढरपूर प्रतिनिधी-- 
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजितआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल पंढरपूर तालुक्यातील आंबे गाव येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे ५०० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे लोकप्रिय युवानेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी वह्या वाटप, रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबीर यांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय शिबिरातील सामाजिक उपक्रमांचा तालुक्यातील विविध स्तरातील लोकांना मोठा फायदा होत आहे. कारखाना चालवणारा सामान्य माणूस अशी अभिजीत पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असून विशेषतः युवा वर्गामध्ये त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसत आहे.

आंबे गावामध्ये डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संचालक सचिन वाघाटे, संभाजी शिंदे,महादेव गायकवाड, हरी रानगर, दत्ता शिंदे, नागनाथ पुढारी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form