करकंबमध्ये महसूल सप्ताह उपविभागीय अधिकाऱ्यानी केले सात बाराचे वाटप.
महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे वतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा होत यामध्ये विविध उपक्रम मधून महसूल विभागाचे वतीने जनतेची कामे मार्गी लावली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कुल येथे युवा संवाद घेणेत आला त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप करणेत आले. महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रउद्योग विभाग यांचेकडील दिनांक 9 नोव्हेंबर 2022 चे शासन निर्णायानुसार भूविकास बँकेचे सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्यानुसार महसूल सप्ताहमध्ये पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील शेतकरी यांचे असे बोजे कमी करून उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांचे हस्ते 7/12, फेरफार चे वाटप करणेत आले. या प्रसंगी एकुण 23 शेतकरी खातेदार यांना भूविकास बँकेचे कर्ज माफीचा लाभ या उपक्रमास अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, नायब तहसीलदार सायली जाधव- नाईक, मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी दादा पाटोळे व निलेश कुंभार, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत, प्राचार्य हेमंत कदम ,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण वंजारी, कोतवाल गुलाब कोरबु, कुंडलिक शिंदे, चंद्रकांत उंबरदंड अदिसह विविध पदाधिकारी,शेतकरी ,युवा वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचेआभार अविनाश देवकते सर यांनी मानले.
~~~~~~~~~~~
मागील तीस वर्षांचे भूविकास बँकेचे कर्ज होते ते मला आजपर्यंतफेडता आले नाही. कर्ज ठेऊन मी मेलोअसतो तर मुला बाळांनी मला माझे माघारी नाव ठेवली असती, पण शासनाने हे कर्ज माफ केले माझी आणि या महसूल सप्ताह मधून मला कोरा 7/12 मिळाला, आता आम्हाला इतर लाभ मिळणेचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे
दिलीप व्यवहारे
लाभार्थी शेतकरी करकंब