उद्या युवासेनेच्यावतीने युवासेना क्रिकेट चषकाचे रोपळे येथे आयोजन

 तालुका युवासेनेचा अनोखा उपक्रम ः क्रिडांगण  व पर्यावरण समृध्दीचा दृष्टीकोन
 पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे शिवसेना युवासेनेच्यावतीने युवासेना क्रिकेट चषकाचे शनिवारी दिनांक १२ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या संघासह सहभागी प्रत्येक खेळाडूस वृक्षरोप भेट देवून ते रोप क्रीडांगणाच्या  परीसरातच रोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे क्रिडांगणाप्रती असणारी जबाबदारी व पर्यावरणाचा  संदेश या दोन्ही बाबी साध्य होणार असल्याची माहिती  आयोजक व शिवसेनेच्या युवासेनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष महादेव भोसले यांनी दिली.

   आयोजीत केलेल्या या युवासेना चषकाचे उद्घाटन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगर्सचे व्हा चेअरमन अनिल सावंत, वाशीम भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक शिवाजी भोसले, संचालक व उपसरपंच हनुमंत कदम, संचालक जनक भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमासाठी  शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख , दत्तात्रय सावंत, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल, जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, युवासेना जिल्हा उपप्रमुख नानासाहेब मोरे, तालुका उपप्रमुख विजय करपे, युवा शहराध्यक्ष विश्वजीत भोसले, तालुका उपप्रमुख रामचंद्र ढोबळे , तालुका संघटक शहाजी जगदाळे , गणपत कौलगे, शहर संघटक विजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर ग्रमस्थ उपस्थित राहणार आहेत.

     पुढे बोलताना आयोजक महादेव भोसले यांनी सांगितले कि, क्रीडांगण नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या क्रीडा  गुणांचा विकास होत नाही. त्यामुळे जी क्रीडांगणे उपलब्ध आहेत. त्यांच्या प्रतीतरी खेळाडूंची असणारी जबाबदारी त्यांच्या मनामध्ये रूजावी. त्याच बरोबर त्या खेळाडूंचा पर्यावरण रक्षणाकडे कल वाढावा या दृष्टीकोनातून या चषकाचे आयोजन केले आहे. त्याचा रोपळे परीसरातील खेळाडू व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे अवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form