केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश
उपक्रम अंतर्गत वसुधा वंदन वृक्षारोपण
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश वसुधा वंदन वृक्षारोपण करण्यात आले. कोंढारकी येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला
यावेळी महिला सरपंच प्रणोती वाघमारे, भारतीय सैनिक मेजर सनम माने, राजाराम सूर्यवंशी, संजय फुगारे , बाजीराव माने, दीपक माने, भीमराव शेवडे , अरुण दांडगे, प्रेम माने, धनाजी घाडगे, आरोग्य सेविका नंदा चंदनशिवे जि प शाळेचे मुख्याध्यापक विजय भोसले गुरुजी दत्तात्रय शिखरे गुरुजी, सुप्रिया शिंदे मॅडम नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे नेहरू मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी मेरी माटी मेरा देश खड्डे खांदून वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला
Tags
सामाजिक