पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी २५१५ योजनेतून प्रलंबित असणारा १ कोटी निधी मंजूर - आ आवताडे

प्रतिनिधी प्रतिनिधी --
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या २५१५ योजनेतून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील २३ गावांसाठी मंजूर असलेला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित असणारा १ कोटी विकास कामांच्या निधीला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

राज्यातील गावांतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकास पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये २५१५ या  योजनेअंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांच्या धोरणात्मक विकासासाठी निधीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तदनंतर  राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आ.आवताडे यांनी या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्यानंतर हा प्रलंबित निधी मतदारसंघाच्या पदरी पडला आहे.

लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील सोयी-सुविधा मजबूत करण्याच्या अनुषंगाने सदर निधी अंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये या योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटकरण व खडीकरण, मुरमीकरण रस्ते, बंदिस्त गटार, सभा मंडप उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, संरक्षक भिंत बांधणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form