स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
पंढरपूर /प्रतिनिधी
कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच पंढरपूर मंगळवेढा यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिर पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, तुंगत, रोपळे, गादेगाव, खर्डी, कासेगाव, पुळुज, उंबरे-पागे आणि करकंब येथे २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आली आहे.
यामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर एचडी देसाई हॉस्पिटल हडपसर पुणे यांच्या सहकार्याने होणार असून यामध्ये मोफत रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, याचबरोबर मोफत आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णालय तपासणीसाठी येताना संपर्क क्रमांक व आधार कार्ड घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन युवक नेते प्रणव परिचारक यांनी केले आहे
Tags
सामाजिक