पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त कामगारांनी या बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणी करून ह्या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे तालुका संयोजक मनोज पवार यांनी आवाहन केलेले आहे.
पंढरपूर प्रतिनिधी -
पंढरपूर तालुक्यांमध्ये असंघटित कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व या कामगार वर्गाच्या कुटुंबाचा विकास होण्यासाठी व व त्यांची मुले ही शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये व वंचित घटकातील या कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग या आयामाच्या माध्यमातून मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगार नोंदणी अभियानाचे संपूर्ण पंढरपूर तालुक्यांमध्ये २०ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन केलेले आहे
तरी पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त कामगारांनी या बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणी करून ह्या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे तालुका संयोजक मनोज पवार यांनी आवाहन केलेले आहे.
या महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदणी करण्यासाठी जे काही घर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या व्यक्ती असतात उदाहरणार्थ पाया खुदाई करणारे, सेंट्रींग वाले, गवंडी ,प्लंबर, फरशी बसवणारे, इलेक्ट्रिक लाईट फिटिंग करणारे ,कलरकाम , सुतारकाम, लोहारकाम बिगारीकाम करणारे सर्व कामगार नोंदणी करू शकतात.
या महामंडळाकडे नोंदणी झाल्यानंतर नोंदीत कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये, आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार, रुपये अकरावी बारावी पर्यंत दहा हजार रुपये, अभियांत्रिकी शिक्षणासाठी साठ हजार रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये, याशिवाय नोंदी बांधकाम कामगाराचा काम करीत असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास पाच लाख रुपये घरकुलासाठी चार लाख रुपये, कामगारांसाठी सेफ्टी किट सुरक्षा संच, नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये, व्यसनमुक्ती साठी सहा हजार रुपये. अशाप्रकारे या बांधकाम कामगार महामंडळाच्या माध्यमातून २८प्रकारच्या योजनांचा लाभ या कामगार वर्गाला होणार आहे तरी पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त कामगारांनी नाव नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत राज व ग्रामविकास विभाग पंढरपूर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.