ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

तालुक्यातून ६९ ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली विषयक ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा आयआयटी सेंटर अरबूज मेंशन पंढरपूर येथे रविवार दिनांक२३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाली .
ऑनलाइन कार्यशाळेत सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन रामदास नागटिळक यांनी केले. यावेळी पाटील सर यांचा सत्कार लेंडवे यांनी केला तसेच आयआयटी कॉम्प्युटर सेंटरचे मालक यांचा सत्कार पाटील सर यांनी केला. 

तसेच या कार्यशाळेचा उद्देश व सर्वांचे स्वागत अन्सार शेख यांनी केले. प्रमोद पाटील यांनी ग्रंथालय संचलनालय ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीत सूत्रधार आणण्यासाठी राज्यातील सार्वजनिक वाचनालयाची माहिती मागवली आहे त्यामुळे निधी वितरणात सूत्रता येणार असून राज्यातील ग्रंथालयाचे वार्षिक अहवाल आता ऑनलाईन सादर करता येणार आहेत अशी माहिती सुरुवातीला  पाटील सर यांनी दिली. तसेच प्रस्तावित वितरण प्रणाली ही संगणका आधारित प्रणाली आहे नव्या प्रणालीमध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथाकडून कामकाजाचे सेवा सुविधा माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे. ग्रंथालयाने भरलेली माहिती तपासणी पडताळणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी तपासणार आहेत.
 सर्व प्रकारचे अहवाल या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल शासनास सादर करणे सोपे होणार आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली यावेळी पाटील यांनी संगणकावर सर्व माहिती तसेच वार्षिक अहवाल कशा पद्धतीने भरावा सर्व मुद्दे व्यवस्थितपणे सर्वांना समजेल अशा भाषेत सांगितले काहींनी शंका विचारल्यावर त्यावरही त्यांनी निरसन केले सर्व माहिती व्यवस्थित सांगितल्यामुळे सर्वांना याची कल्पना आली. तसेच या ठिकाणी ५० कॉम्प्युटरवर सर्वांना वार्षिक अहवाल भरण्यास त्यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्वांनी आपले आपले वार्षिक अहवाल भरून घेतले . यावेळी पंढरपूर तालुक्यातून ६९ ग्रंथालय चे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी रामदास नागटिळकअन्सार शेख ज्योतीराम गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form