आरोग्याची वारी पंढरीच्या दारी

 राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेले महाआरोग्य शिबिर पंढरपूर नगरीमध्ये सर्व सोयी सुविधा सह सुसज्ज!



पंढरपूर --प्रतिनिधी

  वारकरी संप्रदायाची विठुरायाची पंढरी नगरी म्हणजे माहेर येणाऱ्या वारकऱ्यांच्या,साधु संत, महात्मे, वारकरी, विठ्ठल भक्त, प्रमुख संतांच्या मानाच्या पालखी, दिंडी यांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी आतुरतेने वाट पाहत आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेले महाआरोग्य शिबिर पंढरपूर नगरीमध्ये सर्व सोयी सुविधा सह सुसज्ज असून यासाठी भैरवनाथ शुगर, सावंत मित्र परिवार तसेच सामाजिक संस्था यांच्या वतीने येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सेवा करण्यासाठी पंढरपूर येथे वाखरी ,गोपाळपूर, तीन रस्ता या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.


   यासाठी ५००० हजार डॉक्टरांचा ताफा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग, भैरवनाथ शुगर (८युनिट) येथिल सक्षम कर्मचारी वर्ग, स्वंयसेवक,आशा वर्कर्स , रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य सुविधा देण्यासाठी सर्व लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

    शिबिरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्तम अशी तपासणीसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे .तसेच स्वतंत्र वॉररूम कार्यान्वित केली आहे चंद्रभागेच्या तीरावर स्वंतत्र १०खाटाचे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने तयार ठेवण्यात आले आहे.अंम्बुंलन्स बाईक, आरोग्य रथ अशा विविध माध्यमातून रुग्णसेवा देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

   भैरवनाथ शुगर व सावंत परिवार तसेच सामाजिक संस्था यांच्या मार्फत शिबिरात चष्मा,कानाचे मशिन मोफत देण्यात येणार आहे दिनांक २७/२८/२९जून तिन दिवस शिबिर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ३२ प्रकारच्या तपासण्या आणि उपचारांची सोय करण्यात आली आहे.सर्व विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form