भगीरथ भालके यांचा बी आर एस पक्ष प्रवेश निश्चित !

 विचार विनिमय बैठकीत  घेतला निर्णय 




पंढरपूर(प्रतिनिधी)--- भगीरथ भालके हे लवकरच बी आर एस या पक्षात प्रवेश करणार असून याबाबत विचार विनिमय बैठक रविवार दि २५ जून रोजी भालके यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आपल्या हक्काचा आमदार निवडून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मत व्यक्त करावे असे मत भगीरथ भालके यांनी विचार विनिमय बैठकीत केले. तसेच सुरुवातीला भगीरथ भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोहोळ, माढा, पंढरपूर येथे पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत.
पवार साहेबांना चुकीचा संदेश दिला जात आहे. नानाच्या मुलाला आमदार करायचे आहे असे आवाहन येथील कार्यकर्त्यांनी केले
आपल्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे.विधानसभा निवडणुकीत परिचारक आणि आवताडे एकत्र लढूनही १ लाख पाच हजार मते मिळाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांनी बी आर एस या पक्षात जावे, अशी सार्वत्रिक भूमिका यावेळी घेतली.
याप्रसंगी भगिरथ भालके म्हणाले की मला एक संधी दिली तर मी सर्व काही ठीक करेन  पण आपल्यातील गद्दार लोकांनी पठीत खंजीर खुपसले,नानाचा पक्ष म्हणजे जनता, सर्व सामान्य माणूस म्हणून ही विचार विनिमय बैठक घेतली आहे आज परिस्थिती वेगळी आहे 
पक्षाने सर्वात मोठा अन्याय दुसरा उमेदवार देऊन जाहीर करून केला .पक्ष आपणास गृहीत धरले नाही .
  भालके गटातील कार्यकर्त्यांनी आपले मत मांडताना निर्धार केला की  भगिरथ भालके हेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार होणार.
यावेळी माजी नगरसेवक लखन चौगुले, सुधीर धोत्रे, संतोष नेहतराव, संजय बंदपट्टे, किरण घाडगे, अरुण कोळी, अनिल अभंगराव, महादेव धोत्रे, दिलीप कोरके तसेच तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील भालके गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form