केसीआर महाराष्ट्रात; मात्र धक्का तेलंगणात

माजी मंत्री, खासदार ,आमदारांसह ३५ नेते कॉंग्रेस पक्षात



वृत्तसंस्था 

तेलंगणात या वर्षीच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेस, भाजपसह केसीआरनेही तेथे जोरदार तयारी केली आहे. त्यातच कॉंग्रेसने तेथे मजबूत बाधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी बीआरएस पक्षातील अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना धक्का बसला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा पक्ष बीआरएसने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली असताना आणि त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले असताना बीआरएसमध्ये प्रवेशही होणार आहे. त्याची त्यांना आज स्वपक्षातच जबरदस्त धक्का बसला आहे. कारण बीआरएसच्या माजी मंत्री, खासदार, आमदारांसह तब्बल ३५ नेत्यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन- चार माजी आमदारांसह सुमारे ३५ नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगणा कॉंग्रेस नेत्यांचीही भेट घेतली पक्ष प्रवेश करण्यास सुरुवात केली. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form