लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

 चांगल्या दर्जाची कामे करा, स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देवू नका--आ.आवताडे



पंढरपूर --प्रतिनिधी 

आषाढी यात्रेत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाने विविध कामे सुरू केली आहेत. या कामाची पाहणी आ. समाधान आवताडे यांनीआज अधिकाऱ्या समवेत केली. या नंतर चांगल्या दर्जाची कामे करा, स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देवू नका, अशा सूचना आ. समाधान आवताडे यांनी केल्या.


आज सकाळी आ. आवताडे यांनी प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, ६५ एकर आदी परिसराची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी गजनान गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते. प्रशासनाकडून शहरात निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे होत असल्याची असल्याची तक्रार आ. आवताडे यांच्याकडे करण्यात आली. या नंतर आ. आवताडे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी व इतर सुविधा, कामांची पाहणी केली. या नंतर अधिकाऱ्यांना ते म्हणाले, यात्रा कालावधीत पाऊस असल्याने भाविकांना त्रास होणार नाहीत, अशी कामे करावीत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form