राजेंद्र शेळके सोमवारी मंदिर समितीचा पदभार स्वीकारणा !

आषाढीपूर्वी अखेर मंदिराला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाल्याने समाधान 




पंढरपूर --प्रतिनिधी 

 विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकारी पदी  राजेंद्र शेळके  उपजिल्हाधिकारी हे पदभार स्वीकारणार आहेत त्यांना मंत्रालयाच्या विधी व न्याय विभागात पदभार देण्यात आला. 

सोमवारी शेळके हे विठ्ठल मंदिरात येऊन पदभार घेणार असून आषाढीपूर्वी अखेर मंदिराला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. भाविकांच्या , वारकरी, विठ्ठल भक्त, स्थानिक लोक यांच्या मागण्या, सेवा सुविधा, अपेक्षा आदी सर्व विषय वेगाने मार्गी लागू शकणार आहेत. शेळके यांनी मुंबईत पदभार स्वीकारल्याने आता अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या खुर्चीवर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाला आहे.  


  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही विधी व न्याय विभागाकडे असून यासाठी प्रत्येकवेळी महसूल विभागाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियिक्तिवर पाठवावे लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते, त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्याकडे याचा पदभार दिला जात होता. विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके सोमवारी  रुजू होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form