*– मुख्यमंत्र्यांचा निर्णय

 *बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश होणार....!* 

   *रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश.*




करकंब प्रतिनिधी – 
गेल्या काही वर्षापासून बाजारात द्राक्षाला भाव नसल्याने शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळालेले होते. परिणामी बेदाण्याला मागील वर्षाच्या तुलनेत खुपच भाव कमी असल्याने सोलापूर, सांगली, तासगाव, पंढरपूर, करकंब येथील बेदाणा स्टोअरेज फुल भरले असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता व आहे. बेदाण्याची आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने सौदा झाल्यानंतर व्यापारी माल उचलायला तयार नव्हते. त्यामुळे द्राक्षाचा उत्पादन खर्च जास्तीचा असल्याने शिवाय हवामान खराब असेल तर पिक पदरात न पडण्याची शक्यता असते तर दुसरीकडे औषधाचा वाढलेला खर्च व किंमती यामुळे शासनाने बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याची मागणी यापूर्वी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याद्वारे राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे जिल्हा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे यांनी केली होती. व त्या अनुषंगाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला होता. परंतु रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत व रयत क्रांतीचे जिल्हा युवा अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामार्फत ही बाब लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगितली. या रयत क्रांती संघटनेच्या असलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत च्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली असून या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने द्राक्ष उत्पादक यांच्या केलेल्या मागणीला यश आले आहे.
सध्या बेदाणा निर्मितीसाठी खर्च प्रतिकिलो 30 ते 40 रुपये येत असल्यामुळे त्यातच मजुरी आणि रासायनिक खतांची झालेली वाढ व बदलत्या निसर्गाच्या हवामानामुळे वारंवार करण्यात येणारी फवारणी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. काळा चॉकलेटी बेदाणा 20 रु. ते 60 रु. किलो दर व हिरवा बेदाणा 90 ते 130 रुपये असल्याने द्राक्ष उत्पादक व बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आल्यामुळे बेदाणा निलावामध्ये हिरवी बेदाणा 150 रुपये पासुन सुरुवात करावी. तसेच बेदाणा उत्पादकांना भांडवली खर्चाचा विचार करुन शासनाने बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केलेली होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form