आषाढी विशेष...

सोयी सेवा सुविधा, अपेक्षा, मागणीसह होणारी आषाढी वारी 


            #टोकण पास दर्शन सेवा#

अनेक वर्षापासून टोकण पास दर्शन सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी असताना याबाबत मंदिर समिती उदासीन असल्याचे दिसते परंतु याबाबत योग्य नियोजन केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास काही वारकरी मंडळी यांनी व्यक्त केला आहे.

 पंढरपूर --प्रतिनिधी 

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे वर्षाकाठी एक कोटी भाविक तर दैनंदिन पन्नास हजारहून अधिक भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी हजेरी लावतात. तसेच शहराच्या सर्व भागात मठ, लॉज व हॉटेल यांची संख्या देखील वाढली असल्याने भाविकांची वर्दळ असते. 

   मात्र पंढरपूर शहरातील प्रमुख रस्ते,वाहन पार्किंग, रस्त्यावर असणारे अतिक्रमण, स्वच्छतागृहाची दुरवस्था, अनेक वर्षापासून मागणी असणारे महिला स्वछतागृह , दर्शन बारीत तासन तास उभे राहणार्या विठ्ठल भक्तांची गौरसोय,हाॅटेल व्यवसाय तसेच हात गाडीवर विकले जाणारे अन्न पदार्थ, रिक्षावाले तसेच इतर वाहन सेवा देणारी सुविधा, नदीपात्रात सोडण्यात येणार पाणी तेथिल अस्वच्छताआदी अनेक विषय वारी निमित्त समोर येतात परंतु यासाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते मंडळी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने याचा परिणाम स्थानिक व येणार्या भाविक भक्तांवर होतअसल्याने नागरिकांची व भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून नियोजन करण्याचे धाडस पंढरपूर नगर परिषद तसेच मंदिर समिती कडून होताना दिसुन येत नाही .

    दर्शन बारीत असणार्या वारकरी, भाविक, विठ्ठल भक्त यांच्या सोयीसुविधा बाबत मंदिर समिती उदासीन असल्याचे चित्र दिसून येते.मंदिरात मोबाईल व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी मज्जाव केला जातो यामूळे विठ्ठल भक्तांना अडचणी तून जावे लागते.

  सुनियोजन व सातत्याचा अभाव 

   पंढरी नगरीत येणाऱ्या दिंड्या, वारकरी, विठ्ठल भक्त, भाविक यांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या सवलती व निधी उपलब्ध करून देण्यात येतात परंतु यासाठी सहकार, सुप्रशासन, शिस्तबध्द नियोजन समन्वयाचा अभाव दिसून येतोया यात नगरपालिका, मंदिर समिती  प्रशासनाने यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे.

    दिशादर्शक फलक असणे आवश्यक 

पंढरी नगरीत येणाऱ्या वारकऱ्यांना विविध ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी मार्गदर्शक दिशादर्शक फलक नगरपालिका व मंदिर समितीने लावणे आवश्यक आहे.

    आषाढी एकादशी निमित्त सध्या पंढरपूर येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन,प्रशासन, नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना, विविध संस्था प्रयत्नशील आहेत असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.प्रशासन तात्पुरती कारवाई, कायदेशीर नोटीस देण्या ऐवजी कठोर कारवाई करावी अशी जनसामान्यांची मागणी होताना दिसत आहे.

पंढरपूर शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज काढून टाकले पाहिजे या साठी बरेच वेळा तक्रार करून हि याबाबत ठोस निर्णय होताना दिसून येत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form