*खग्रास चंद्रग्रहण*
कार्तिक शुद्ध १५ पौर्णिमा
दि ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे.हे ग्रहण दु २ वा ३९ मि सुरु होत असून सायं ६ वा १९ मि पर्यंत आहे. ग्रहण दु २ वा ३९ मि सुरु होत असले तरी भारत देशात सुरुवातीस ग्रहण दिसणार नाही. महाराष्ट्रात आपल्या भागातील सूर्यास्तापासून ग्रहण दिसणार त्यामुळे सूर्यास्तापासून ग्रहण पाळायचे आहे.
पंढरपूर शहरातील सूर्यास्त ०५ वा ५१ मि आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील भाविकांनी दु ०५ वा ५१ मि ते ०६ वा १९ मि पर्यंत या कालावधीमध्ये ग्रहण पाळावे.
ग्रहणाचे वेध हे आपल्या भागातील सूर्योदया पासून सुरु होत आहे. पंढरपूर शहरातील सूर्योदय स.६ वा ३१ मि आहे त्यामुळे स. ०६ वा ३१ मि पासून वेध पाळावे.
अशक्त, आजारी, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांनी स. ११ पासून वेध पाळावे. वेधामध्ये म्हणजे स ११ पासून भोजन करू नये. पाणी पिणे,झोपणे, मलमूत्र विसर्जन करता येईल.
ग्रहण पुण्यकालामध्ये म्हणजे दु ५. ५१ ते सायं ०६.१९ पर्यंत ग्रहणाचे नियम कडक पाळावे ,
यामध्ये भोजन,झोपणे,मलमूत्रविसर्जन इ करू नये.या काळात देव धर्म, जप तप नाम स्मरण करावे.
सायं ६.१९ नंतर ग्रहण सुटल्यावर अंघोळ करून देवपूजा करून भोजन करावे.
संदर्भ :- दाते पंचांग.
:- श्री पांडुरंग नाझरक गुरुजी.