पंढरपूर सिंहगडच्या प्रफुल्ल लोखंडे यांची म्हाडा (महाराष्ट्र शासन) येथे सहाय्यक अभियंता पदी निवड

म्हाडा सरळ सेवा भरती अंतर्गत श्री प्रफुल्ल लोखंडे यांना मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय यांचे शुभ हस्ते दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले

पंढरपूर ---(विनोद पोतदार)
सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागातून शिक्षण घेतलेल्या प्रफुल्ल लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), महाराष्ट्र शासन येथे सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे. म्हाडा सरळ सेवा भरती अंतर्गत श्री प्रफुल्ल लोखंडे यांना मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय यांचे शुभ हस्ते दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले, प्रफुल्ल लोखंडे यांचे हे यश म्हणजे सिंहगड अभियांत्रिकी स्थापत्य विभागाच्या यशस्वी परंपरेतील अजून एक मानबिंदू आहे अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
   निवड झालेल्या प्रफुल्ल लोखंडे यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form