पंढरपूर --- (प्रतिनिधी)
तरुण युवा वारकरी व श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी चिरंजीव ह.भ.प.प्रसन्न गोविंद बेलापूरकर (वय २५)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सदर निधन वार्ता पंढरपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली. आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वा. त्यांच्या राहत्या घरापासून,गांधी रोड येथून अंत्ययात्रा निघणार आहे.