विश्व वारकरी संघाच्या पुणे संपर्क प्रमुख पदी ----ह. भ. प. वेदपाठक महाराज


पंढरपूर --- (विनोद पोतदार)
वारकरी संप्रदायामध्ये भजन,गायन, कीर्तन, प्रवचन  करणारे सर्व परिचित असणारे ह. भ .प .धनंजय महाराज यांनी वारकरी संप्रदायातील आपले स्थान अढळ केले आहे तसेच सांप्रदायिक कर्तृत्वाची जाण , सामाजिक भान , राष्ट्र प्रेम,अशा विविध गुणाने व निष्ठेने ते आपले सांप्रदायिक कर्तृत्व पार पाडतात. अशा आपल्या  कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच त्यांची विश्व वारकरी संघाच्या पुणे जिल्हा संपर्क पदी निवड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय संपर्क प्रमुख ह.भ.प.शाम महाराज चवरे यांनी दिली.
       

       विश्व वारकरी संघाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे विजयादशमीच्या पूर्वेसंध्येला महामेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये नगर प्रदक्षिणा , भव्य रॅली, किर्तन, महामेळाव्यात मान्यवर यांचे मार्गदर्शन , वृध्दाश्रम येथे अन्नदान, शालेय साहित्य वाटप,पायी येणाऱ्या जेष्ठ वारकरी यांचा सत्कार ,भोजन अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी मान्यवर मंडळी यांच्या हस्ते नवं निर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र,शाल, श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,ह.भ.प.तुकाराम महाराज चवरे,ह.भ.प.बापुसाहेब महाराज ढगे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, महाराज मंडळी, जेष्ठ वारकरी,युवा वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form