सहकार शिरोमणीचा दिपावली सणासाठी 200/- चा हप्ता..

पंढरपुर ---(विनोद पोतदार)
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास पहिली उचल 2100/- रुपये देणार असून, जिल्ह्यातील इतर कारखन्याच्या बरोबरीने अंतीम दर देण्यात येईल. मागील वर्षी गळीतास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 200 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे असे कल्याणराव काळे यांनी सांगितले.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 23 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ्‍ आज जेष्ठ् संचालिका मालनबाई काळे यांचेशुभहस्ते व यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे उपस्थितीत झाला. यावेळी काळे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराजाचे वंशज ह.भ.प. बापुसाहेब मोरे- देहुकर महाराज होते. तत्पुर्वी कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे व जयश्रीताई कवडे यांचे शुभहस्ते गव्हाण व काटापुजन पार पडले. 

*साखर कारखानदारीमध्ये सोलापूर जिल्ह्यात ऊस्‍ दराची स्पर्धा सुरु असून, त्यामध्ये आपण कुठेही मागे राहणार नाही, गतवर्षी गळीतास आलेल्या ऊसाची पुर्ण एफआरपी तसेच ऊस वाहतुकदारांची देणी दिली असून, यंदाच्या गळीत हंगामासाठी करार केलेल्या तोडणी वाहतुकदारांना दुसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी 200 ट्रॅक्टर 150 बजॅट 150 बैलगाडी  व एक हारर्वेस्टर मशिन यांना ॲडव्हान्स देण्यात आले आहेत. कामगारांना 15 दिवसाच्या पगारा इतकी रक्कम बक्षिस देवुन कामगारांचीही दिपावली गोड करण्यात येणार असून यावर्षी सभासदांना दिपावली सणासाठी 50 किलो साखर देण्यात येणार आहे. कारखान्यातील मशिनरी दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले असून, यंदा 6 लाख टनाचे उदिदष्ट् पुर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज  ठेवण्यात आली आहे. गेल्या 22 वर्षात कारखान्याच्या वजन काट्याबाबत सभासदांकडून एकही तक्रार प्राप्त्‍ झाली नसून भविष्यात तशाच पध्दतीने शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहुन कामकाज केले जाईल. असे काळे यांनी सांगितले.*

अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. बापुसाहेब देहुकर महाराज यांनी माणसाच्या आयुष्यात प्रगतीसाठी सहकाराची आवश्यकता असून, समाज पुढे नेण्यासाठी सहकारच उपयोगी पडणार आहे. कल्याणराव काळे यांनी सहकाराचा अभ्यास पुर्ण केला असून, त्यांच्यामध्ये आता परिपक्वता आली आहे. असे सांगितले.

संचालक सुधाकर कवडे यांनी आपल्या भाषणात कारखाना पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शेतकरी व तोडणी वाहतुकदारांबरोबर कामगारांनीही योगदान देणे महत्वाचे आहे. कामगार व सभासद ही कारखान्याच्या रथाची दोन चाके असून, व्यवस्थापनाने या दोन्ही घटकाच्या विश्वासावर गाळपाचे उद्दिष्ट् ठेवले आहे. त्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे, आजच्या गळीत हंगाम शुभारंभाचा कार्यक्रमाशी भावणिकता जोडली असून, कारखाना उभारणीत आयुष्य खर्ची घातलेल्या कै.वसंतदादा काळे यांच्या बरोबरीने योगदान देणाऱ्या मालनकाकु काळे यांच्या हस्ते हा गळीत हंगाम शुभारंभ होत आहे असे सांगितले.
          यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे, मोहनदादा उपासे, उत्तमकाका नाईकनवरे, चांगदेवदादा कदम, जयसिंह देशमुख, तसेच कॉग्रेस आय चे पंढरपूर शहराध्यक्ष ॲड. भगवान भादुले, नितीन शेळके, सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग कौलगे, संभाजी बागल, तानाजी जाधव, भारत गाजरे, राजाराम माने, इस्माईल मुलाणी, काका म्हेत्रे संचालक मा.व्हा.चेअरमन मारुतीदादा भोसले, बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, बिभिषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, प्रदिप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर अरुण बागल, तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमास आलेल्या उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले तर आभार संचालक युवराज दगडे यांनी मानले, सुत्र संचलन समाधान काळेसर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form