तुझं जगणं सोडू नकोस सखी -- सौ सुनेत्राताई पवार
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
रुक्मिणी विद्यापीठ गणेशनगर पंढरपूर यांच्या वतीने इसबावी पंढरपूर येथे खास महिलांच्यासाठी *भोंडला* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेच्या सचिवा मा सौ सुनेत्रताई पवार सो यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.संस्थेच्या वतीने सन 1994 पासून सतत 28 वर्ष पंढरपूर शहरात विविध सांस्कृतिक परंपरा जोपासून त्यातून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध कला क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या सखींचा सन्मान करण्यात येतो. सदर कार्यक्रमावेळी इसबावी परिसरातील महिलांनी सूप नाचवणे, घागर फुंकणे,झिम्मा, फुगडी, दांडिया, फेर धरून नाचणे, गाणी गाणे,संगीत खुर्ची,उखाणे,तसेच पाककृती , रांगोळी या स्पर्धेत व कलाकृती सहभाग नोंदवला. यावेळी सर्व वयोगटातील स्त्रीया व एका 85 वर्षाच्या आजींनी सहभाग घेऊन गाणी गायली. यावेळी उपस्थित महिलांनी दाद देऊन रंगत वाढवली.
उपस्थित महिलांनी मा. सचिवांना आपण या प्रमाणे दरवर्षी असेच सांस्कृतिक कार्यक्रम घेत जावे आम्ही आपणास साथ देऊ व रंगत वाढवू असे सांगितले. यावेळी मा सौ सुप्रियाताई पवार, मा नगरसेविका भाग्यश्री शिंदे, सौ सीमाताई अधटराव डॉ सौ विभूते मॅडम व बहुसंख्या महिला पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरनंदन प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.