दीनबंधू कमळे गुरुजी स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्काराने राजुभाई मुलाणी सन्मानित

पंढरपूर ---(विनोद पोतदार)
पंढरपूर विवेक वर्धिनी विद्यालय येथील शिक्षक, पत्रलेखक,राजूभाई मुलाणी यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने दिला जाणऱ्या 
दीनबंधू कमळे गुरुजी स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कथा मालेचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधूत म्हमाणे डॉ श्रुती वडगबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार सोलापूर फडकुले सभागृहात  देण्यात आला. मुलाणी यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना आत्तापर्यंत अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते अनेक सामाजिक संघटनेत   काम करीत आहेत. या कार्यक्रमासाठी अशोक म्हमाने,अशोक खानापुरे, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, शिवाजी येडवे,जैनुद्दीन शेख, नवनाथ लोणकर यांच्यासह जिल्हाभरातील अनेक शिक्षक उपस्थित होते.
    

    मुलाणी यांच्या पुरस्कारा बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड.वैभव टोमके, खजिनदार सलीम वडगावकर, संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल,आप्पा चोपडे, अजित 
नडगिरे मार्केट कमिटीचे सभापती 
दिलीपआप्पा घाडगे, पांडुरंग चे चेअरमन कैलास खुळे, नगरसेवक संजय निंबाळकर, उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील, उत्तरेश्वर मुंढे, संजय पवार, नाना देवकते,अमोल हुंगे,हनुमंत मोरे
जैनुद्दिन मुलाणी, अशोक कोर्टिकर,धनंजय नाईनवरे, शोभा माळवे, व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form