भाविक व माचणूर ग्रामस्थांनी केला विरोध
मंगळवेढा ------
गणपती बाप्पाच्या आगमनाचे आज सर्वत्र स्वागत होत असताना मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिर परिसरातील फरशांची तोडफोड केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तोडफोडीनंतर तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माचणूर येथे पाच हजार वर्षापूर्वीचे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर आहे सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांची आहे
गणेश मंदिरात तोडफोड झाल्याचं समजताच भावी भक्ताने व माचणूर ग्रामस्थांनी केला विरोध
आज पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माचणूर मंदिरात येऊन कोणालाही न सांगता थेट गणेश मंदिर परिसरात तोडफोड करण्यास सुरूवात केली.स्थानिक भाविक आणि पुजारी विरोध करू लागताच काम थांबवण्यात आले.
गणेश उत्सवाच्या काळात सर्वत्र आनंदाचे व जल्लोषात गणेश आगमन होत असताना कारवाई केल्याने भाविकांच्या संतापाची लाट उसळली आहे. जरी पुरातत्व विभागाच्या नियमाविरोधात ही फारशी लावली असली तरी यामुळे या मंदिराचे आणि गाभाऱ्याचे पावित्र्य जपले जात होते, असे असताना पुरातत्व विभागाने आज गणेश चतुर्थीलाच येथे उत्खनन केल्याने भाविक संतप्त झाले असून ग्रामस्थांनी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.वास्तविक हे मंदिर पुरातत्व विभागाकडे गेल्यापासून याच्या मजबुतीसाठी या विभागाने काय केले असा सवाल करत यापूर्वी शेकडो वर्षांपासून स्थानिक भाविकांनीच या मंदिराची डागडुजी आणि जोपासना केली असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.पुरातत्व विभागाच्या नियमाचा जरी भंग झाला असला तरी किमान तोडफोड करण्यापूर्वी ग्रामस्थांशी चर्चा करणं आवश्यक होते. गणेशचतुर्थीला अशी कारवाई करणे कितपत योग्य होते असा सवाल आता ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत.