वात- पित्ताचे करी शमन | चंदन करी कफाचे वमन ||**उष्णतेचे करी दमन । देवपुजा मनोमन ||*




#१५_वर्षांनी_एकरी_१००_कोटींचे_उत्पन्न_देणारे_पीक:- #चंदन
             चंदनाच्या मुख्य ८ जाती असून, पैकी श्वेतचंदन व रक्तचंदन हेच जनसामान्यांना ज्ञात आहे. चंदन वृक्ष हा १३ मीटर ते २२ मीटर उंच वाढतो. चंदन फळे पक्षी व माणसे खातात. तर सर्प, नाग हे चंदनाचा आसरा घेतात.
              चंदन हे शीतल, मुत्रजनन, हृदयावसादक, हृदयबल्य आहे. चंदनाला लाकडातील श्रीखंड म्हणून ओळखले जाते. चंदनाचे उपयोग:-
१) तहान थांबण्यासाठी:- शहाळ्याच्या पाण्यात चंदनखोड उगाळून पिल्यास तहान थांबते.

२)उष्णता कमी करणेसाठी:- बत्ताशावर ५-३० थेंब आवश्यकतेनुसार चंदन तेल टाकून खाल्ल्यास मुत्रदाह, उन्हाळं, उष्णता, उष्माघात कमी होतो. त्रास बंद होतो.

३) हृदयाची गती वा धडधड कमी करण्यासाठी:- चंदनतेल बत्ताशावर टाकून खाणे वा चंदन उगाळून लेप दिल्यास हृदयाची धडधड कमी होऊन, हृदयशक्ती वाढते.

४) पित्तज्वर, विषमज्वर :- चंदन उगाळून लेप केल्याने घाम सुटतो, अंगाचा दाह कमी होतो. म्हणून उन्हाळयात विश्वमालक पांडुरंगजींना चंदन उटी लावतात.

५) दुर्गंधीयुक्त कफप्रधान रोगांमध्ये:- चंदन वापरल्याने कफातून रक्त पडणे बंद होते. चंदन खोड उगाळून २ चमचे खाणे उपयुक्त ठरते.

६) रक्तातिसार:- संडासमधून रक्त पडत असल्यास, मुळव्याधीतून सतत रक्त पडत असल्यास, चंदनाचा उपयोग करतात. चंदनतेल सेवन , चंदन लेप, चंदन खोड उगाळून २ चमचे खातात.

७)त्वचेचा शोथ, विसर्प,लहान गळवे, घुमडे, घामोळे:- चंदन हे कापूर व गुलाबपाण्यात उगाळून लावतात. यामुळे तारुण्यपिटीकासुद्धा कमी होतात. ४० दिवस लेप लावणे आवश्यक.

८) डोकेदुखी, खरुज, खाज:- चंदन-कापूर-गुलाबपाणी एकत्र करुन लावल्यास उत्तम! दररोज ३ वेळा ३ दिवस

९) मुत्रपिंड विकार, मुत्राशयास सुज, प्रोस्टेट ग्रॅंथी, रक्तशुद्धी:- चंदन खोडाचा वापर यथायोग्य करणे आवश्यक आहे. चंदनखोड व सागाचे खोड एकत्र उगाळून २ ते ४ चमचे नियमित दोनवेळा चाटण केल्यास डायलिसीस करणे कमी होते. कफ असलेल्या व्यक्तीने चंदनाचा वापर कमी करावा.

१०) उष्माघात :- कपाळावर चंदनलेप लावल्यास उष्माघाताचा त्रास होत होत नाही. म्हणून उन्हाळयात कपाळावर दररोज चंदन गंध लावणे क्रमप्राप्त ठरते. दक्षिणेत व उत्तरेत  सर्रास कपाळभर चंदन गंध लावतात, त्यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही. उष्माघात होत नाही.

११) शत्रुत्व :- चंदनमाळा गळ्यात घातल्यास शत्रुभाव कमी होतो. शत्रूसुद्धा मित्र होतो. म्हणून चंदनाच्या खोडातील गाभ्यापासून तयार केलेली चंदनमाळ वापरणे श्रेयस्कर ठरते.

१२) लक्ष्मीप्राप्तीस्तव:- कपाळावर चंदनगंध, गळ्यात चंदनमाळ, वासासाठी चंदन धूप वा आगरबत्ती, चंदन तेल सेवन, चंदनलेपन आवश्यक आहे.

१३) कफ उत्सर्जनास्तव:- चंदनाच्या दर्प वा सुवासाने शरिरातील कफ, श्लेष्म पातळ होऊन बाहेर पडू लागतो व सर्दी होते, नाक चोंदते.

१४) स्थावर लाभास्तव:- घरात किमान सव्वाकिलो चंदनखोड देवपूजेत व तिजोरीत वा नैऋत्येस असणे आवश्यक आहे.

१५) वात- पित्त शांत करणेसाठी:- चंदनाचा वापर आवश्यक आहे. पण कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी चंदन वापर शक्यतो टाळावा. चंदनयुक्त संतूर साबण, चंदन धूप, चंदन आगरबत्ती हि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी वापरु नये, मात्र वात व पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी दररोज चंदन वापर करणे फायदेशीर ठरते.

१६) चंदन तेल:- बाजारात मिळणारे चंदन तेल हे ॲालिव्ह तेलात चंदन चुर्ण मिसळून केलेलेच मिळते.
              वस्तुत: १ टन चंदनापासून ४५ ते ४७ किलो शुद्ध चंदन तेल निघते. भारतात ३०००० टन चंदन खोडापासून १४०० ते १५०० किलो शुद्ध चंदन तेल निघते. म्हणजेच २१-२२ किलो चंदनखोडापासून १ किलो चंदन तेल निघते. या शुद्ध चंदनतेलाची ३ ते ५ लाख रुपये प्रती किलो किंमत आहे. तर चंदन चुर्ण  ॲालिव्ह तेलात टाकून केलेल्या चंदन तेलाची किंमत ३०००० रुपये ते ५०००० रुपये किलो आहे.

१७) कर्करोग प्रतिबंधक, मोबाईल रेडीएशन प्रतिबंधक:- शुद्ध चंदन तेलाच्या वापराने व चंदन खोड उगाळून कपाळी लावलेल्या गंधाच्या वापराने कर्करोग होत नाही, तसेच मोबाईलच्या रेडीकल्सचा शरीरावर घातक परिणाम होत नाही. पर्यायाने बौद्धीक क्षमता चांगली वाढते.

१८) बौद्धीक क्षमता वाढण्यासाठी,  सात्विक वृत्तीसाठी, तामसिक वृत्ती कमी करण्यासाठी, नीयत साफ राखण्यासाठी, कामवासना नियंत्रणासाठी:- चंदन खोड उगाळून कपाळी गंध लावणे क्रमप्राप्त आहे.

१९) करोडोपती होण्यासाठी:- एकरी ४०० चंदन झाडे लावून शेजारी कडुलिंब लावल्यास ९ व्या वर्षी २ लाख तर १५ व्या वर्षी ६ ते ८ लाख प्रतीवृक्ष उत्पन्न मिळते. बंगळरु च्या चंदन संशोधन केंद्रातून वा कृषीमहर्षी भारतभाऊ रानरुई पंढरपूर यांच्याकडून आज चंदन बी वा रोप घेऊन लावल्यास १५ व्या वर्षी एका झाडापासून किमान २५ लाख तर एकरी १०० कोटी रुपये उत्पन्न मिळणे स्वाभाविक असून क्रमप्राप्त आहे.

२०) चंदन हा मेष राशीचा वृक्ष असून, मेष राशीच्या व्यक्तींनी दर वाढदिवसाला चंदनाची २१ झाडे लावून संवर्धित केल्यास अनेक समस्यांचा निपटारा होतो. तसेच मेष राशीचे वातविकार व पित्तविकारांचे पुर्णत: शमन होते.

२१) चंदनामुळे कर्क, वृश्चिक, मीन राशीचा कफ वाढत असला तरी तळव्याची आग, तळपायाची जळजळ कमी होते. चंदन वापरामुळे या ३ राशींना अविश्वसनीय पैसा मिळतो.

२२) चंदनाची फळे हे पक्ष्यांचे व माणसांचे आवडते खाद्य आहे. तर  मेंदू संप्रेरकास्तव तसेच थंडपणा, शीतलता, सुवास यामुळे सर्प, साप, नाग यांचे चंदन वृक्षांमध्ये वास्तव्य असते. सापाला शीतलता आवश्यक असते.

२३) चंदन हे कडुलिंबाजवळील परजीवी वनस्पती आहे. कडुलिंबाजवळील चंदनच जास्त वाढते व सुवास वृद्धींगत करते. म्हणून कोकणात कडुलिंब नसल्याने चंदन नाही.

२४) त्वचा नितळ व तेजस्वी होण्यास्तव:- चंदन वापर आवश्यक आहे. चंदनाचा फेसपॅक  हा उत्तम क्रांतिकारी बदल करतो. फेअर ॲन्ड लव्हली पेक्षा १००० पटींनी लक्षणिय आहे.

२५) शेतकरी तालीला एकरी २०-२५ झाडे लावून, १५ वर्षे अन्य उत्पादने घेत राहिले तरी ५ कोटी रुपये १५ वर्षांनी एकरी मिळवू शकतील, यात शंका नाही.

२६) चंदन हे कामभावना नियंत्रित करुन, सदभावना वृद्धींगत करत असल्याने, मंदिरांमध्ये चंदनाचा अधिकतम वापर होतो. चंदनाच्या सुवासाने मेंदूच्या नसा खुलतात.

टिप:- गर्भवती महिला व कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यांच्या सल्ल्यानेच चंदनाचा वापर करावा. शक्यतो करु नये.

सौजन्याने ---
*संदर्भ:- नक्षत्रवृक्ष हेच जीवन, ✍🏼 राधेश बादले पाटील, पंढरपूर श्रावण कृष्ण-११, शके १९४३, गुरुवार दि.०२-सप्टेंबर -२०२१*

🚩*साप्ताहिक राष्ट्रसंत* 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form