द. ह. कवठेकर प्रशालेत गुरुवंदना कार्यक्रम


पंढरपूर ----
 पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्यावतीने गुरुवंदना व छात्राभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमासाठी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्री. सुरेंद्र काणे सर, सचिव श्री. महावीर गांधी यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी केले. डॉक्टर सुरेंद्र काणे सर यांनी प्रास्ताविक केले.  यात त्यांनी भारत विकास परिषदेचे देशभरातील कार्य व शाखा यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.  पदाधिकारी श्री. जयंत आयाचित सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक योगदान, भारतीय संस्कृती गुरु शिष्य परंपरा यावर भाष्य केले. यावेळी प्रशालेतील उपस्थित शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार समारंभ भारत विकास परिषदेच्या वतीने संपन्न झाला.  


         यावेळी प्रशालेतील शिक्षकांना दिलेल्या मानपत्राचे वाचन डॉक्टर सौ. वर्षा काणे यांनी केले. सौ चौंडावार मॅडम यांनी गुरुवंदना गीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम तर समारोप राष्ट्रगीत म्हणून झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदाधिकारी मंदार केसकर यांनी केले. यावेळी भारत विकास परिषदेचे पदाधिकारी डॉक्टर अनिल पवार, श्री मंदार लोहकरे, श्री. विनोद सुरवसे, श्री मिलिंद वाघ, श्री.पी.एस.कुलकर्णी, श्री.सुनील परळीकर, सौ मोनिका शहा, भक्ती रत्नपारखी सौ. रोहिणी कोर्टीकर  सह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पारंपारिक पद्धतीने गुरुवंदन कसे करावे याबाबतची शास्त्रोक्त माहिती डॉ.  सौ. वर्षा काणे यांनी विद्यार्थ्यांना दिली व त्याप्रमाणे त्यांच्याकडून गुरुवंदन करून घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form