वचनाचे मोल जाणणारा चेअरमन..
आज आमच्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी उगवलेला दिवस निश्चितच सुवर्णाक्षरात लिहीण्या योग्य होता..
होय.. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आदरणीय चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिलेला शब्द पाळलाय.. बिल थकलेल्या सगळ्या सभासदांच्या खात्यावर आजपासून थकीत ऊसबिले जमा होतील..
गेली दोन वर्षांपासून ही बिले थकीत होती.. सामान्य सभासदांच्या हक्काचे घामाचे पैसे दिल्याशिवाय मी कारखान्याची मोळी देखील टाकणार नाही हा शब्द अभिजीत पाटील यांनी निवडणुकीत आणि विजयानंतर दिला होता.. तो आज पूर्णत्वास नेला गेला आहे..
संघटना म्हणून एखाद्या कारखानदाराबरोबर युती करण्याचा हा आमचा निर्णय फार महत्वाचा होता त्यामुळे आमच्यावरही सभासद बांधवांचं दडपण होतंच.. परंतु चार कारखाने सुसाट चालवणारे आमचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळत अवघ्या महाराष्ट्रातील वैभवशाली इतिहास असणाऱ्या कारखानदारीच्या क्षेत्रात एक वेगळाच पॅटर्न निर्माण केलाय..
निवडणूक झाली अनेक टिकाटिपण्णी झाली,अनेक कुरघोड्या झाल्या, बळिराजाचं भलं व्हावं हा उदात्त हेतू ठेवुन वाटचाल करणाऱ्या या बहुजन नेतृत्वाच्या मार्गात अनेक काटे पेरण्याचे आणि अनेक "तिढे" टाकण्याचे काम तालुक्यातील अनेक विघ्नसंतोषी लोकांनी केले परंतु या सर्वांतून निर्दोष सुटलेच पण अगदी ताठ मानेने समोर येत शेतकर्यांसोबत हात हात घालुन हा तालुक्याचा राजवाडा पुन्हा सुरू होवुन त्याचे गतवैभव निर्माण करण्याचे काम झाले..
दिलेल्या शब्दाला जागुन चेअरमन अभिजीत पाटील यांनी तालुक्यातील सभासदांचे तोंड दिवाळीआधीचं गोड केले आहे.. गेले दोन वर्षांपासून प्रलंबित थकीत बिले ती ही सत्तेत आल्यानंतर फक्त दोन महिन्यात. एकीकडे कारखाना पुन्हा सुरू करण्याची गडबड तर दुसरीकडे शेतकर्यांचे बिल देण्याची धडपड.. पण म्हणतात ना "एखाद्या गोष्टीसाठी जर आपला प्रयत्न प्रामाणिक असेल ते कार्य यशस्वी होतेच"
आज चेअरमन अभिजीत पाटील यांनी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाना विठ्ठलच्या स्वाभिमानी सभासदांची गर्वाने मान आणखी ताठ झाली आहे यात शंकाच नाही.
आबासाहेब भविष्यात विघ्नसंतोषी लोकांच्या नाकावर टिच्चून तालुक्यातील तमाम जनतेला देखील आपण एका अघोषित हुकुमशाही आणि गुलामगिरीतून मुक्त कराल ही खात्री या निमित्ताने वाटते..
- रणजित बागल
राज्य प्रवक्ता,स्वाभिमानी शेतकरी संघटना,युवाआघाडी