अवधूत गांधी यांच्या लोकसंगीत ,लोककला भक्तिरसांनी पंढरपूरकर मंत्रमुग्ध


पंढरपूर प्रतिनिधी:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली, सुरुवातीला सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य श्री ‌ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाडसाहेब, अवधूत गांधी व कलाकारांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली, सुरुवात वारकरी सांप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी ने वातावरण भक्तिमय झाले त्यानंतर रुप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान,अबीर गुलाल, माझ्या म्हल्हारीची वारी,काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती,तसेच लोककला मधील विविध भक्ती रचना भारुड,एकतारी भजने,गवळणी, तुणतुणे दुर्मिळ वाद्य संबळ,तबला,पखवाज ,जुगलबंदी मंत्रमुग्ध करणारी होती,शेवटी भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा, हेचि दान देगा देवा या भैरवीने सुंदर अशा कार्यक्रमांची सांगता झाली,त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत पांडुरंग पवार,अभय नलगे, राजेंद्र बघे,हेमंत क्षीरसागर विजय सोनवणे, सोमनाथ तरटे यांनी अप्रतिम केली,निवेदन विक्रम बिस्किटे सरांनी केले,यावेळी पंढरपूर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशोत्सव संगीत यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत, ७ तारखेपर्यत पं शौनक अभिषेकी, अंजल नंदिनी गायकवाड, मुग्धा वैशंपायन,आनंद जोशी यांच्या रात्री ७:३०ते१०:००या वेळेत तुकाराम भवन येथे  श्रवणीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form