साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त भोसे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.समाधान गायकवाड यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगांव भोसे ता- पंढरपूर येथील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले,
याप्रसंगी ते बोलत होते. 'सामाजिक कार्य करण्यासाठी पैशाची नव्हे तर सुयोग्य मानसिकतेची गरज असणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या विविध समाजोपयोगी, विधायक उपक्रमांनी साजरा केल्या पाहिजेत.'असे मत त्यांनी मांडले. यावेळी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब देवकर , उपाध्यक्ष रामदास कोरके, माजी सरपंच प्रतिनिधी भाऊसाहेब देवकर, उपसरपंच अमोल देवकर ,व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप कडाळे तसेच परमेश्वर अडगळे, योगिता अडगळे मॅडम ,अमर अडगळे,रोहिदास अडगळे,राहुल गायकवाड मुख्याध्यापक संजय रेपाळ,स्वाती थोरात आदी मान्यवर, ग्रामस्थ,शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता लोहार यांनी केले तर आभार शैलजा रेपाळ यांनी मानले.