*शेतीपंपचा वीज पुरवठा पूर्ववत करावा_-----स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी


पंढरपूर ---
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता श्री गवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले..                                         

      त्यानंतर राज्यातील वीज कपातीचे सावट कमी झाल्यानंतर ही शेतीपंपाचा वीज पुरवठा हा पूर्वीप्रमाणे दहा तास करण्यात आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना वीज टंचाईला सामोरे जावे लागत आहे पंढरपूर तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना पाणी देत असताना या वीज कपातीमुळे शेतकऱ्यांची कसरत होत आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे शेती पंपाला पूर्ववत दहा तास वीज पुरवठा सुरू ठेवावा जर दोन तासाची कपात रद्द करून दहा तास वीज पुरवठा दिला नाही.                   तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल होणाऱ्या नुकसानीस शासन व महावितरण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी यावेळी स्वाभिमानीचे सचिन पाटील सचिन आटकळे हरि रानगर सचिन घोडके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form