राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतनचे घवघवीत यश; आयुष गवळीला सुवर्णपदक!

पंढरपूर प्रतिनिधी - नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण ७ पदके पटकावली आहेत. या स्पर्धेत आयुष गवळी याने सुवर्णपदक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच, नेहा घोडके हिने चमकदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे. तर तैमूर शेख, स्वराली घोडके, वेदांत जाधव, सुरज येडगे आणि सौरभ येडगे या पाचही विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विकास रितोंड आणि विकास कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशालेतील इतर सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले असल्याची माहिती विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांनी दिली. या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या सत्कार आणि शुभेच्छा सोहळ्याप्रसंगी संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरांतून या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form