*माणूस हा विचारशील प्राणी आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाषेतून विचार करतो, त्यामुळे मातृभाषा ही, माणसाची अस्मिता आणि अस्तित्वाची खूण असते.*
माणसाने भाषेच्या माध्यमातून आजवर कला, साहित्य, ज्ञान, तत्त्वज्ञान, यांची निर्मिती केलेली आहे, साहित्य विचार, तत्त्वज्ञान, यांच्याद्वारे संस्कृतीची जणू भाषेच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेली जातात.
कोणतीही भाषा ही स्थिर नसते, ती सतत प्रवाह असते, बदलत असते, त्यामुळे दर बारा कोसांवर भाषा बदलते, आणि दर पिढी गणिक भाषेला नवीन ऊर्जा मिळत असते. त्याही अर्थाने ती सतत बदलत जाते कोणतीही भाषा, बालवयातच ज्ञानेश्वरी, लिळा चरित्र, विवेक सिंधू, यासारखे जागतिक दर्जाचे ग्रंथ कसे प्रसिद्ध होऊ शकले, आठशे वर्षांपूर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले आहेत, तेव्हा मराठी बोली भाषा नव्हती तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.
*बोली भाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे*
मराठीला ५२ बोलीभाषा आहेत, मराठीला या सर्व बोलीभाषा महत्त्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य, खूप सकस आहे, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, अशा ५२ बोलींनी मराठीला श्रीमंत केलेले आहे.
*संतांनी, मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक बहिणाबाई, उद्धव शेळके, रंगनाथ पठारे, मच्छिंद्र कांबळे, नामदेव ढसाळ, प्राध्यापक राम नगरकर माननीय सदानंद देशमुख, या सर्वांनी मराठी बोलीभाषेला श्रीमंत केलेले आहे*
*मराठीतील, दोन हजार वर्षांपूर्वीचा जुनाआद्य ग्रंथ.... गाथा*
महाराष्ट्र प्राकृत, या नावाने ओळखले गेले, *संत ज्ञानेश्वर, संत सावता महाराज, संत एकनाथ, फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आगरकर, रानडे, टिळक, साने गुरुजी, इत्यादींनी त्यांच्या साहित्याचे जैविक नाते महत्त्वाचे आहे,* मराठी भाषेला पुढे नेण्याचे कार्य या संत महात्म्यांनी केलेले आहे.
*प्राचीन काळातील अनेक शिलालेख हे मराठी भाषेत आहेत,आणि त्यांनी या भाषेचा महरठीनो असा मराठी बोलणाऱ्या लोकांचा उल्लेख आढळतो,*
मराठीचा प्रवास या वेगवेगळ्या भाषा नसून मराठी या एकाच भाषेची ती रुपे आहेत.
संस्कृत महाकवी कालिदास, यांच्या शाकुंतल, आणि मृच्छकटिक, या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत.
*महाभारत* या जगप्रसिद्ध महाकाव्यात, अनेक मराठी शब्द आलेले आहेत, यज्ञाच्या वेळी पंडितांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवतात दाखवून दिले आहे, संस्कृती धर्मवासी असली तरी हे पंडित खाजगीत मराठीत बोलत असत, हे यातून उघड होते.
*संत एकनाथांनी..... संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली*
असे संतप्त उद्गार काढले होते, *मराठी भाषा ही चोरांपासून जन्मलेली नाही, ती हातात जादू असलेल्या, कष्टकऱ्यांची भाषा आहे, ती श्रमाची, घामाची, निर्मितीची, भाषा आहे.* मराठी ज्ञान भाषा आहे, धर्मभाषा आहे, अक्षरभाषा आहे, अजरामर भाषा आहे,असेही एकनाथ महाराजांनी सांगितले. तसेच विंचू चावला ही एकनाथांची भारुडाची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला पाकृत म्हणतात, कारण महाराष्ट्र पाकृत हेच मराठी आहे. मराठी वर संस्कृत चा जरूर प्रभाव आहे, मात्र मराठीने संस्कृत कडून जेवढे घेतले, त्याच्या दाम दुप्पट परतही केले, मराठीवर इतर पाकृत भाषा आहेत, मराठीचे स्वतःची अस्सल आहे, ती जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही.
*जगातल्या अनेक भाषांमध्ये राष्ट्रगीत आहेत, विश्व गीत.... पसायदान*
*मात्र एकट्या मराठी मध्ये आहे*
अनेक जाती धर्माचे लोक मराठी बोलतात, अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती, या मराठीने पोटात सामावून घेतलेले आहे.
अहमदनगर मधील नेवासा परिसरामध्ये, यादव काळातील सहा तर मराठी काळातील सात कोरीव शिला लेख सापडले आहेत, या सर्व कोरीव लेखांची भाषा संस्कृत आहे, त्यातील काही शब्द मराठी आहेत. विशेष म्हणजे याच यादवकाळात आणि या परिसरात, *चक्रधरांनी आणि ज्ञानदेव* यांनी मराठी भाषा अवगत केली. मराठी भाषा ही एक प्राचीन भाषा आहे, ती लोकभाषा होती, या लोक भाषेला चक्रधर स्वामींनी गद्य स्वरूप तर ज्ञानदेवांनी पद्यरूप देऊन तिचा दर्जा वाढवला.
आज जगभरात अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रीक, संस्कृत, अरबी, चिनी, या लोक व्यवहारांच्या भाषा नाहीत, त्यांची आधुनिक रूपे आणि प्राचीन रुपांमध्ये अंतर आहे, मात्र नवीन शब्द घडविणे पुढील भाषेतील शब्दांची निर्मिती करण्याचे काम या अभिजात भाषेने केले आहे, किंवा करीत आहेत. या भाषांनी आजपर्यंतच्या संशोधनानंतर मराठी ही एक प्राचीन समृद्ध भाषा आहे, तिला दोन हजार वर्षांपासून चा इतिहास आहे.
*वाचाल तर वाचाल*
पण आज मोबाईल सारखे मध्यम आल्यामुळे लोक वाचन विसरली आहेत, या माध्यमाचा अतिवापर वाढल्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टा, व इतर ॲपद्वारे अनेक कविता लेख, व्यंगचित्रे, यांचे व्हाट्सअपने इकडून तिकडे एका क्षणात जाते आणि बरोबर ते मराठी भाषिकांच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते, काही वेळेस आपण लिहिलेले लेख, कॉपीराईट करून दुसऱ्याच्या नावाने प्रकाशित होतात, त्यामुळे काही वेळेस चुकीच्या माहितीमुळे व अपुऱ्या ज्ञानामुळे मराठी भाषेचा अपभ्रंश होतो, याची त्यांना माहिती नसते, एक शब्द जरी चुकीचा पडला तर त्याच्यामुळे संपूर्ण वाक्य बदलतं, अशा प्रकारचे लेखन करताना काही वेळेस रोमन लिपीचा वापर होतो, आणि रोमन मराठी भाषेचा दर्जा कमी होतो, आज लिहित कोणी बसत नाहीत.
*आज शिक्षणाची ही तीच दशा आहे*
सातवी आठवीतील मुलांना वाचता येत नाही, ही शिक्षणाची दुर्दशा आहे, आज इंग्रजीचा प्रभाव वाढल्याने प्राथमिक शाळा बंद पडतात की काय ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रत्येक पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत न घालता इंग्रजी शाळेत घालतात,
महाराष्ट्रातील संतांनी आणि विचारवंतांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांचे वाचन करावे, *गीता* यात तर जगावे कसे याबाबतची मानव जातीला उपयोगी पडणारी संपूर्ण माहिती असून तिचे वाचन केले तर समजेल, वाचन, मनन ,आणि त्यानुसार आचरण कसे करावे याबाबतची माहिती आहे.
*सकल विश्वाचे कल्याण साधणारे ग्रंथ आवडीने वाचावेत, आणि त्यासाठी मुद्दाम सवड काढावी असे मराठी भाषेचे अभ्यासक ह.भ.प. सोनोपंत दांडेकर सांगतात, ज्ञानोबा तुकोबा, यांचे कार्य जाणणे, प्रत्येकाचे कर्तव्य आहे,*
परप्रांतातील व परदेशातील विद्वान ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, आपली तर मातृभाषा मराठी, असूनही ज्ञानेश्वरी वाचली नसेल तर तुमच्या जीवनात काहीच अर्थ नाही, असेही ते वारंवार सांगतात.
*मराठी लोक भाषा, मातृभाषा टिकली पाहिजे व तिचे मूल्य जोपासले पाहिजे*
मराठी भाषेला ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी *अभिजात मराठी* भाषेचा दर्जा मिळाला 🙏🏻
✒️
*श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो. ९९७०७४९१७७*
