दसरा म्हणजे केवळ सण नव्हता, तर माणसं जोडणारा, नाती जपणारा आणि आपुलकी वाढवणारा आनंदाचा सोहळा होता!

🌿🌼 *आमच्या वेळचा दसरा… आठवणींचं सोनं!* 🌼🌿 लातूर जिल्ह्यातील तालुका लातूर सुचिता उमाकांत गुनाले लातूर 🙏
आपल्या वेळचा दसरा किती वेगळा आणि मनाला आनंद देणारा होता! दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जाऊन आपट्याची पाने (सोनं) देऊन नमस्कार करायचा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि लहान-मोठ्यांशी प्रेमाने संवाद साधायचा. संपूर्ण गावात सोनं वाटत फिरताना गाव एक कुटुंब असल्याचा आनंद अनुभवायला मिळायचा. सायंकाळचे पाच वाजले की सर्व मित्रमंडळी आणि वडीलधारी मंडळी एकत्र जमायची. जवळच्या शेतात जाऊन आपट्याच्या झाडाची पूजा करायची, आपट्याची पाने आणायची आणि ती एकमेकांना देऊन दसऱ्याचा आनंद द्विगुणित करायचा. त्या काळात शिष्टाचार होता, नम्रता होती, मोठ्यांचा आदर होता आणि प्रत्येकाच्या मनात एकमेकांविषयी आपुलकी होती. कोणाच्या घरी गेल्यावर आदराने नमस्कार करणे, प्रेमाने बोलणे आणि आपुलकीने विचारपूस करणे, हीच आपली खरी संस्कृती होती. आज काळ बदलला, माणसं बदलली आणि सण साजरे करण्याच्या पद्धतीही बदलल्या. पण त्या जुन्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात ताज्या आहेत. पुन्हा ते दिवस येणार नाहीत, हे माहीत असूनही मन मात्र पुन्हा त्याच काळात रमून जाते. 🌺 खरंच, त्या काळचं सोनं आपट्याच्या पानांत नव्हतं; तर माणसांच्या मनात होतं! आपट्याची पाने देताना आपण केवळ सोनं वाटत नव्हतो, तर प्रेम, आदर, संस्कार आणि माणुसकी वाटत होतो. आजच्या पिढीला आपण हाच वारसा देऊया—माणसं जपूया, नाती जपूया आणि आपल्या संस्कृतीचा मान राखूया! 🌼 *जुन्या आठवणींचं सोनं कधीच जुनं होत नाही!* 🌼🌹 ✍️ सुचिता उमाकांत गुणाले लातूर 🌹

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form